रॅली पूर्ण गावभर काढण्यात आली,चौकाचौकात नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवून बसणे, वारंवार हात धुणे, तोंडावर मास्क बांधणे तसेच ज्यांना ताप असेल त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाची लस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असून ४५ वर्षांच्या वरील संपूर्ण नागरिकांनी ती जास्तीत जास्त नागरिकांनी टोचून घ्यावी, असे सांगण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्रशाला अविनाश गेडाम, उपसरपंच क्षितिज उके, आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण शेडमाके, ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम, पलटूदास मडावी, शंकर पारधी, रेखाताई मडावी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुळाराम राखडे, आरोग्य सेवक गेडाम, आरोग्य सेविका उईके, आशा वर्कर, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच समृद्धी फाउंडेशनचे प्रदीप वरंभे, चक्रधर आठवले, निशांत ठाकरे, आशिष नाहाले, तुषार ठाकरे,अखिल मिसार, विजय पारधी तसेच भीम चॅम्पियन्स सर्कलचे बादल मेश्राम, अंकुर उके, शिल्पक घोडेस्वार, संकेत फुले, बादल डोनाडकर व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.
कुरुड येथे कोरोना जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST