शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

गोंडवानाचा दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 01:51 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारी रोजी सोमवारला सकाळी ११.३०

कुलगुरूंची माहिती : विजय भटकर, रणजित मुशाहरी उपस्थित राहणार गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारी रोजी सोमवारला सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर हे दीक्षांत भाषण करणार असून विशेष अतिथी म्हणून मेघालयचे माजी राज्यपाल तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी रणजित मुशाहरी उपस्थित राहणार आहेत. सदर दीक्षांत समारंभात हिवाळी २०१५ व उन्हाळी २०१६ मध्ये पदवी व पदव्युत्तर व पदविका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण १२ हजार ३५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. कल्याणकर यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या निर्देशानुसार २५३ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र व दानदात्यांकडून विविध अभ्यासक्रमांना घोषीत करण्यात आलेले २४ सुवर्ण पदके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे कार्यकारी कुलसचिव दीपक जुनघरे, परीक्षा नियंत्रक जे. व्ही. दडवे आदी उपस्थित होते. हिवाळी परीक्षेत ७८४ विद्यार्थी उत्तीर्ण ४गोंडवाना विद्यापीठांतर्गत उन्हाळी २०१६ या परीक्षेत कला, वाणिज्य, विज्ञान व इतर शाखा मिळून पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे एकूण ११ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. हिवाळी २०१५ च्या परीक्षेत सर्व शाखा मिळून पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे एकूण ७८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्वांना पदवी देण्यात येणार आहे. विद्यापीठातून तिघांनी मिळविली आचार्य पदवी ४आचार्य पदवीधारकांची अधिसूचना गोंडवाना विद्यापीठाने निर्गमित केलेली आहे. गोंडवाना विद्यापीठातून प्रथम आचार्य पदवी मिळविणारे अस्लम याकूब सूर्या (संगणकशास्त्र), जयवंत काशिनाथ शिंपी (शारीरिक शिक्षण) हे आचार्य पदवी मिळविणारे दुसरे विद्यार्थी आहेत. योगेश वामनराव थेरे यांनी (सुक्ष्मजीवशास्त्र) विषयात आचार्य पदवी प्राप्त केली असून सदर पदवी मिळविणारे तिसरे विद्यार्थी आहेत. या तिन्ही प्रज्ञावंतांना आचार्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे. सुवर्ण पदकाचे २४ प्रज्ञावंत मानकरी ४संध्या देवराव खेवले (एमए इंग्रजी) शांताराम पोटदुखे सुवर्ण पदक व विठोबाजी शेंडे सुवर्ण पदक, अस्मिता दिलीप कोथेवार (एमए मराठी) गोविंदराव मुनघाटे सुवर्ण पदक, श्यामप्रिया नामदेव मडावी (एमए हिंदी) स्व. डॉ. मथुराप्रसाद दुबे कुलदीप स्मृती सुवर्णपदक, दीक्षा विठ्ठल गायकवाड (एमए पॉली व प्राकृत) सुभद्रा धनवंत खोब्रागडे सुवर्ण पदक, प्रतीक्षा दिलीप कामडे (बीकॉम) स्व. शेषराव लक्ष्मणराव जगनाडे स्मृती सुवर्ण पदक, स्व. रामचंद्र चक्करवार स्मृती पदक व स्व. मामीडवार स्मृती पदक, मोनाली भैय्या तामगडे (एमबीए) सांबाशीव आर्इंचवार सुवर्ण पदक, अंकित शरदकुमार गुप्ता (एलएलबी) स्व. अ‍ॅड. ताराचंद खजांची शताब्दी स्मृती सुवर्ण पदक, ज्योती हरिषचंद्र झुरे (एमएससी) स्व. डॉ. वैभव दोंतुलवार स्मृती सुवर्ण पदक, सविता धर्मराव बन्सोड (एमए राज्यशास्त्र) स्व. वसंतराव दोंतुलवार स्मृती सुवर्ण पदक, प्रियंका भोरूलाल करूणाकर (बीए हिंदी वाङ्मय), कोमल दिलीप धनके (बीए भूगोल), सीमा अंबादास कोसे (बीए राज्यशास्त्र), प्रियंका मंगलदास वंजारी (बीए मानसशास्त्र), शेख नुरसाभाबानो इस्लामुद्दिन (बीए संगीत), जनार्धन शंकर पेरगुवार (बीए आंबेडकर विचारधारा), अंकित शरदकुमार गुप्ता (एलएलबी), रिया मुकेश जैन (एलएलबी) यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ४आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधून प्रथम येणाऱ्या दिगांबर श्रीहरी शेंडे (एमए मराठी), आदिवासी प्रवर्गातून सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल तृप्ती श्रीकृष्ण श्रीरामे (बीएससी) यांनाही सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.