शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नळ योजना नियमित सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:37 IST

गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आवाहन : गडचिरोलीतील आठ सरपंचांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे. आज नागपूर विभागात १११ ग्रामपंचायतीअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा ई-शुभारंभ केलेला आहे. आता ग्रामपंचायतींनी पाणी पट्टीकर वसुल करून नळ योजना नियमित सुरू ठेवाव्या, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर विभागातील पाणी पुरवठा योजनांच्या ई- भूमिपूजनाचा कार्यक्रम नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच स्वच्छता विभागाचे सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधत असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, कार्यकारी अभियंता घोडमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, उपविभागीय अधिकारी कटरे, वरिष्ठ भुवैज्ञानिक पुराम, शाखा अभियंता संजय खोकले, भुजंगराव पदा, माटे उपस्थित होते.पुढे बोलताना ना. फडणवीस म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत आलेली योजना म्हणजे नळ पाणी पुरवठा योजना मोठया प्रमाणात राबवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याकरिता ८८ कोटी रुपये खर्चाला मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आठ नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. तसेच ग्रामपंचायतीनी ही योजना नियमित सुरु राहण्यासाठी पाणी पट्टीकर वसुलीसाठी प्रयत्नरत असावे. यावर्षी आपण ३३ कोटी वृक्ष लागवड करुन एक मोठी हरीत क्रांती करीत आहोत यामध्ये सर्व ग्रामपंचायतीनी, सर्व कार्यालयांनी, नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या स्मार्ट ग्रामपंचायत सोबतच हरीत ग्रामपंचायत करावी, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे गडचिरोली जिल्ह्यातील आठ नळ पाणी पुरवठा योजनांचा ई- भूमिपूजन करुन शुभारंभ केला. यामध्ये अहेरी तालुक्यातील महागांव बु. आरमोरी मधील वडधा, चामोर्शी मधील कुनघाडा व कळमगांव एकोडी, धानोरा तालुक्यातील मिचगांव व साखेरा, एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली आणि सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवीपेठा या गावांचा समावेश आहे. या आठ योजनांसाठी ५ कोटी ८९ लक्ष ८७ हजार रूपये खर्च होणार आहेत. यावेळी ८ ग्रा.पं.चे सरपंच हजर होते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीsarpanchसरपंच