शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

१५ कोटीतून काँक्रिट रस्ते व नालीचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:27 IST

गडचिरोली नगर परिषदेला राज्य शासनाने १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पांदन रस्ते, नाली बांधकाम व ओपन स्पेसचा विकास केला जाणार आहे. यामध्ये एकूण ४४ कामांचा समावेश आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून निधी : गडचिरोली शहराचे रूप पालटण्यास होणार मदत; निविदा प्रक्रियेनंतर बांधकामास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेला राज्य शासनाने १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पांदन रस्ते, नाली बांधकाम व ओपन स्पेसचा विकास केला जाणार आहे. यामध्ये एकूण ४४ कामांचा समावेश आहे.विसापूर टोली ते वैनगंगा नदीघाटापर्यंत पाथरगोटा पांदन रस्त्याचे खडीकरण करणे, खरपुंडी मार्ग ते कठाणी नदीपर्यंत पांदन रस्ता तयार करणे, चांभार मोहल्ला ते कठाणी नदीपर्यंतच्या पांदन रस्त्याचे खडीकरण रामनगर, पोटेगाव बायपास मार्ग ते राम मंदिर, मुख्य मार्ग ते रामनगर, हनुमान मंदिर ते ताकसांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नाली बांधकाम करणे, सोनापूर प्रभाग क्र.११ मधील आंबोरकर, बारसागडे ते कुमरे, उंदीरवाडे, सोरते, धकाते, चिचघरे, मीना कोडाप ते मडावी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नालीचे बांधकाम, चामोर्शी मार्ग ते रामायन खटी, सतीश विधाते, नंदू गुंडकवार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नालीचे बांधकाम, नगर परिषद रामपुरी शाळा ते नरेंद्र भरडकर यांच्या घरापर्यंत व कॅम्प एरियापासून शंकर दुधबळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट व बंदिस्त नाली बांधकाम, अ‍ॅड.प्रमोद बोरावार यांच्या घरापासून कोटगले, प्रमोद तरारे यांच्या घरापर्यंत सिमेंट क्राँकिट रस्ता व बंदिस्त नाली बांधकाम, गणेशनगरातील प्रफुल मेश्राम यांच्या घरापासून नंदकिशोर गिरडकर ते कविता होळी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नाली बांधकाम.गोकुलनगराील वैशाली वासेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट मार्ग, अभिजीत बोदलकर ते संघरक्षित फुलझेले यांच्या घरापर्यंत काँक्रिट रोड व बंदिस्त नाली. लक्ष्मीनगरातील आरमोरी मार्ग ते विनोद खोब्रागडे, मेश्राम, संजय पराते यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट मार्ग व नाली बांधकाम, सोनापूर वॉर्डातील रामटेके डुप्लेक्स ते आऊटपर्यंत रस्ता व नाली बांधकाम. लांझेडा वॉर्डातील कारमेल शाळा ते नीलमवार, विलास चलाख यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नाली. सोनापूर वॉर्डातील अयोध्यानगर कॉलनीमध्ये सिमेंट काँक्रिट रोड व नाली बांधकाम. प्रभाग क्र.१ मध्ये आरमोरी मार्ग ते गुरूकुंज कॉलनीत रस्ता व नाली, बेसिक शाळा ते आशीर्वाद मंगल कार्यालय, माळी मोहल्ल्यातील हनुमान मंदिर, रामगिरवार यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली. प्रभाग क्र.१ मध्ये दिलीप धात्रक, धाईत ते निंबोरकर ते रोहिदास मंदिरापर्यंत रस्ता व नाली. प्रभाग क्र.२ मध्ये मधुकर नीलमवार ते विलास चलाख ते शेंडे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली. कारमेल शाळेच्या मागे पठाण किराणा ते विठोबा गराडे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली, आंबुलकर ते करकाडे यांच्या घरापर्यंत नाली. प्रभाग क्र.३ मध्ये दिलीप भांडेकर ते वासेकर यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली. प्रभाग क्र.३ मध्ये नगर परिषद, पंडित जवाहलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेत वर्गखोल्यांचे बांधकाम. प्रभाग क्र.५ मध्ये चामोर्शी मार्ग ते हॉटेल देवांश, रेमाजी कोल्हे, सतीश नंदगिरवार यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व नाली. शाहू नगर येथे चामोर्शी रोड नाक्यापासून पापडकर गोदामापर्यंत रस्ता, नाली बांधकाम. सोनापूर वॉर्डातील तलाव मार्ग, अयोध्यानगरातील तलाव मार्ग ते धकाते, मोरे, बारसागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व नाली बांधकाम. प्रभाग क्र.११ मध्ये बांबोळे ते उसेंडी यांच्या घरापर्यंत रोड व नाली बांधकाम, नगर परिषद गडचिरोली येथे नवीन अग्निशमन गाडी खरेदी करणे. दिलीप धात्रक, धाईत, रमेश ठवरे यांच्या घरापासून मुखरू निंबोरकर ते रोहिदास मंदिरपर्यंत काँक्रिट रोड व बंदिस्त नाली. आंबोरकर यांच्या घरापासून कायरकर यांच्या घरापर्यंत व पुढे रोहिदास मंदिरापर्यंत सिमेंट रोड व बंदिस्त नाली. रामनगरातील जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत पहिला मजला बांधणे, जिल्हाधिकारी कॉलनीत नाली, रस्ता व बगिचाचे बांधकाम केले जाणार आहे.अनेक ठिकाणच्या ‘ओपन स्पेस’चा होणार विकासलांझेडा वॉर्डातील किरमोरे यांच्या घरामागील हिरो शो रूमजवळील असलेल्या मोकळ्या जागेला संरक्षण भिंतीचे बांधकाम, स्नेहनगरातील डॉ.मुनघाटे यांच्या घराजवळील ओपन स्पेस, सावसाखडे यांच्या घरासमोर भरडकर यांच्या घराजवळील ओपन स्पेसला संरक्षण भिंती बांधणे व जागेचा विकास करणे, शनिवारे यांच्या घरामागील चापले यांच्या घराजवळील, कन्नामवार घराजवळील, नागोबा मंदिराजवळील देविदास नैताम यांच्या घरालगतचा ओपन स्पेस, चामोर्शी मार्गावरील दर्गा विकसित करणे, डॉ.किलनाके यांच्या घरामागील, देवतळे यांच्या घराजवळील ओपन स्पेस, सोनापूर येथील मीना कोडाप यांच्या घराजवळच्या ओपन स्पेसचा विकास करणे, रामटेके डुप्लेक्सजवळील मोकळ्या जागेचा विकास करणे, कॅम्प एरियातील सर्वे क्र.२६/२ मधील ओपन स्पेसचा विकास केला जाणार आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली