शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: July 31, 2015 01:47 IST

स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील इयत्ता ८ ते १० वीच्या तुकड्यांना मान्यता नसल्याने अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर

गडचिरोली : स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील इयत्ता ८ ते १० वीच्या तुकड्यांना मान्यता नसल्याने अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांच्या ७ जुलै २०१५ च्या पत्रानुसार जवळपास १५० ते २०० विद्यार्थ्यांना खासगी तथाकथित नामांकित निवासी शाळांमध्ये समायोजित केले जाणार आहे. अशा प्रकारचे आदेश शासनाने निर्गमित केल्याने ते घटनाबाह्य असून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला आहे. जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळेला गुरूवारी भेट दिली असता, आश्रमशाळेत अनेक समस्या दिसून आल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार, आमदार यांचे आश्रमशाळेतील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष असल्याने त्यांनी राजीनामा का देऊ नये, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे. काँग्रेस सरकारने २००६ मध्ये इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्याचे धोरण अवलंबिले. त्यानुसार गडचिरोली येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेची निर्मिती करण्यात आली. परंतु भाजप सरकारने विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्याचे धोरण अवलंबले आहे. शासकीय आश्रमशाळेतील एका मुलाला वार्षिक ३० हजार अनुदान दिले जाते. मात्र खासगी इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये एका विद्यार्थ्यामागे ५० हजार रूपये देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अनुदान देण्याचे षड्यंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ओबीसी समाजाच्या समस्याही सुटल्या नाही. शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधव शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, असा आरोपही काँग्रेसने केला. शिष्टमंडळात शंकरराव सालोटकर, पंकज गुड्डेवार, पांडूरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, काशिनाथ भडके, नंदू वाईलकर, अमिता मडावी, पी. टी. मसराम, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, बालू मडावी, गौरव कुळमेथे, सुरेश परचाके उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)