शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवादी समजून ‘पब्लिक टार्गेट’, छत्तीसगड पोलिसांवर पत्रक‘बॉम्ब’

By संजय तिपाले | Updated: May 22, 2024 17:41 IST

जनआंदोलनाची तयारी : १०७ जण गमावल्याचा घाव नक्षल्यांच्या जिव्हारी

गडचिरोली : छत्तीसगडसह महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझमाडच्या विस्तीर्ण जंगलात पाच महिन्यांत १०७ नक्षल्यांचा छत्तीसगड पोलिसांनी खात्मा केला. छत्तीसगड व महाराष्ट्र पोलिसांकडून नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र झाल्याचा घाव नक्षल्यांच्या जिव्हारी लागला आहे. नक्षलवादी समजून छत्तीसगड पोलिसांनी सामान्यांना गोळीचा निशाणा बनवल्याचा गंभीर आरोप पत्रकातून केला आहे. हे पत्रक २२ मे रोजी समोर आले आहे.

महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील अबुझमाड हा नक्षल्यांचा गड आहे. गडचिरोली पोलिसांची नक्षलविरोधी मोहीम, कम्युनिटी पोलिसींग यामुळे नक्षलचळवळीला हादरे बसले. अनेक नक्षली नेते चकमकीत ठार झाल्याने जिल्ह्यात ही हिंसक चळवळ काहीशी कमकुवत झाली आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या कुरापती सुरुच असतात. तेथे नक्षल्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे तेथील पोलिसांनीही नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे. पाच महिन्यांत तब्बल १०७ नक्षल्यांना तेथील पोलिसांनी कंठस्नान घातले. मात्र, माओवादी संघटनेचा पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याने एक पत्रक जारी करुन छत्तीसगड पोलिसांच्या कायपध्दतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.    

वन्यप्राण्यांच्या दहशतीत आदिवासी वर्षानुवर्षे जंगलात राहतात. मात्र, नक्षलवादी ठरवून निरपराध लोकांचा बळी घेतला जात असल्याचा आरोप केला आहे. याविरुध्द जनआंदोलनाची हाक दिली असून वकील, लेखक, कलावंत, विद्यार्थी अशा बुध्दीजिवी घटकांना साद घातली आहे. 

पत्रकातील आरोप असे...छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्याच्या काकूर- टेकामेट्टा जंगलात पारंपरिक पूजापाठ करण्यासाठी काही महिला गेल्या होत्या. गावकऱ्यांसमोर या जंलगात चार युवकांना पोलिसांनी गोळी झाडून संपविले. याच परिसरात त्याच दिवशी सहा जणांना ठार कलेे.१० मे रोजी बिजापूरच्या  जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या गावातील १२ जणांना घेरले व गोळ्या झाडून संपविले, असे गंभीर आरोप या पत्रकात करण्यात आले आहेत.

कतरंगट्टा चकमकीनेही दुखावले नक्षलीभामरागड तालुक्यातील कतरंगट्टा येथे १३ मे रोजी झालेल्या चकमकीत पेरमिली दलम प्रभारी व विभागीय समिती कमांडर वासू कोरचा, कंपनी क्र. १० ची सदस्य रेश्मा मडकाम व पेरमिली दलम सदस्य कमला मडावी यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. यावरुनही पत्रकातून नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांवर आरोप केले आहेत. या चकमकीनेही नक्षलवाद्यांना हादरा पोहोचल्याचे पत्रकातील तपशीलावरुन स्पष्ट होत आहे. 

या पत्रकाबद्दल माहिती नाही. ते पत्रक पाहण्यात आले नाही. मी सध्या सुटीवर आहे, त्यामुळे याबद्दल मला अधिक सांगता येणार नाही.-  सुंदरराज पत्तीलिंगम, विशेष पोलिस महानिरीक्षक बस्तर, छत्तीसगड

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली