शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

२२५ ग्रामपंचायतींना मिळणार कनेक्टिव्हिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 22:21 IST

दुर्गम व आदिवासी भागातील २२५ ग्रामपंचायतींना ओएफसी केबलद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळाल्याने गावाचे रूप पालटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्देइंटरनेटने जोडणार दुर्गम भागातील गावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम व आदिवासी भागातील २२५ ग्रामपंचायतींना ओएफसी केबलद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळाल्याने गावाचे रूप पालटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.शासनाने प्रत्येक विभागाचा कारभार आॅनलाईन करण्यास सुरूवात केली आहे. याला ग्रामपंचायतीही अपवाद राहिल्या नाही. गावापर्यंत केबल टाकण्याचा खर्च लाखोच्या घरात असल्याने मागील पाच वर्षांपासून केबल टाकण्याचे काम देशभरात सुरू आहे. जिल्ह्यात पहिला टप्पा पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, कुरखेडा हे तालुके घेण्यात आले होते. या तालुक्यांमधील ग्रामपंचायतीमध्ये ओएफसी केबल टाकण्याचे काम आता जवळपास पूर्णत्वास पोहोचले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आता धानोरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली या तालुक्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश केला गेला आहे. ओएफसी केबलच्या इंटरनेटची क्षमता साध्या ब्रॉडबँडपेक्षा कित्येक पटीने अधिक राहते. गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाल्याने विविध आॅनलाईन कामे गावातच करता येणार आहे. या केबलवरून खासगी नागरिकांनाही इंटरनेटची सुविधा घेता येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज शुभारंभओएफसी केबल टाकण्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते सोमवारी दुपारी २ वाजता होणार आहे. तहसील कार्यालय अहेरी येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अहेरी तालुक्यापासूनच दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरूवात केले जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Internetइंटरनेटgram panchayatग्राम पंचायत