शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:43 IST

नोट बंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असल्याचा आरोप करून नोटबंदीच्या निर्णयाचा तसेच इतर निर्णयांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे मंगळवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनोटाबंदीचा विरोध : सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नोट बंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असल्याचा आरोप करून नोटबंदीच्या निर्णयाचा तसेच इतर निर्णयांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे मंगळवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवाव्या. ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत आले आलेत. या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देण्यात यावी. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्य व्यक्तीचे बजेट बिघडले आहेत. तसेच महागाईमध्ये भर पडली आहे. मागील वर्षी मावा, तुडतुड्यामुळे धानपीक करपले. त्या शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी, संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. धानाला दीडपड हमीभाव द्यावा. धान खरेदी केंद्र सुरू करावे आदी मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, हसलअली गिलानी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शंकरराव सालोटकर, नगरसेवक सतिश विधाते, अमोल भडांगे, रजनिकांत मोटघरे, लहुजी रामटेके, पी. टी. मसराम, वसंता राऊत, प्रतिक बारसिंगे, नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर, जितू मुनघाटे, राकेश गणवीर, गौरव आलाम, कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, आरीफ कनोजे, पांडुरंग घोटेकर, तुळशीदास भोयर, बंडू पिपरे, संजय पिपरे, लक्ष्मण सातपुते, रविंद्र धोडरे, सुरज सातपुते, नारायण पिपरे, मारोती बारसागडे, आकाश पिपरे, प्रदीप सातपुते, सुरेश मरस्कोल्हे, मधुकर गेडाम, गिरीधर सातपुते, तानाजी परचाके यांनी केले.

टॅग्स :Note Banनोटाबंदीcongressकाँग्रेस