केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे केले. हे कायदे रद्द करण्यात यावे यासाठी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने अनेक वेळा चर्चा करूनही शेतकरीविरोधी कायदे रद्द केले नाहीत. उलट शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार दडपशाही मार्गाचा अवलंब करीत आहे. पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती मागे घेण्यात याव्यात. या व इतर अनेक मागण्यांसाठी काॅंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आंदाेलनाचे नेतृत्व युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी आ. आनंदराव गेडाम, डाॅ. नितीन काेडवते, डाॅ. चंदा काेडवते, प्रभाकर वासेकर, विश्वजित काेवासे, पांडुरंग घाेटेकर, शंकरराव सालाेटकर, दिवाकर मिसार, अनिल काेठारे, ढिवरू मेश्राम, नंदू वाईलकर, सूरज मडावी, संजय चन्ने, आनंदराव धाेडरे, काशिनाथ भडके, बापू मडावी, बाॅबी शेख, नितेश राठाेड, जितेंद्र मुनघाटे, प्रतीक बारसिंगे, तुळशीराम भाेयर यांनी केले.
काॅंग्रेसतर्फे केंद्र शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST