शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या डेप्युटी सीईओवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 18:09 IST

दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसून ग्रामसेवकासोबत दारु पिणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'मुक्तीपथ' संस्थेच्या तक्रारीवरुन आरमोरी पोलिसांनी गुरुवारी रात्री केली.

 गडचिरोली - दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसून ग्रामसेवकासोबत दारु पिणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'मुक्तीपथ' संस्थेच्या तक्रारीवरुन आरमोरी पोलिसांनी गुरुवारी रात्री केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम धनकर व ग्रामसेवक नीलेश जवंजाळकर यांच्यावर मुंबई दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरमोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी(पंचायत)शालिकराम धनकर व ग्रामसेवक नीलेश जवंजाळकर हे गुरुवारी (दि.२४)रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरमोरी येथील भारत भोजनालयात भोजन करीत होते. यावेळी ते ग्लासात लाल रंगाचे द्रव्य ओतून पिताना मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांना दिसले. त्यांनी ही माहिती 'मुक्तीपथ'चे संचालक डॉ.मयूर गुप्ता यांना दिली. गुप्ता यांनी दूरध्वनीवरुन आरमोरी पोलिसांत तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी भारत भोजनालयात जाऊन चौकशी केली असता  धनकर व जवंजाळकर यांच्या ग्लासात लाल रंगाचे द्रव्य आढळून आले. हे द्रव्य दारु असल्याची खात्री पटल्यानंतर दोघांवर रात्री दीड वाजता मुंबई दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांच्याही रक्तांचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार आहे. पोलीस उपनिरिक्षक दिलीप मुनघाटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दारुबंदी कायद्यान्वये उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची ही मागील काही वर्षांतील पहिलीच घटना असून यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाGadchiroliगडचिरोली