शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

विजेसंबंधीची तक्रार करा आता मुंबईत

By admin | Updated: June 13, 2014 00:06 IST

महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारींचा विशेषत: वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारीची दखल पूर्वी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरही तक्रार निवारण केंद्रात घेण्यात येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून

गडचिरोली : महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारींचा विशेषत: वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारीची दखल पूर्वी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरही तक्रार निवारण केंद्रात घेण्यात येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून हे केंद्र बंद करण्यात आले आहे. आता वीजेसंबधीची तक्रार मुंबई भांडूप येथील केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण केंद्रातच स्विकारली जाणार आहे. गेल्या पाच महिन्यापासून महावितरणाने ही व्यवस्था निर्माण केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महावितरणाच्या नागपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. महावितरणाने सुरू केलेल्या या केंद्रीय तक्रार निवारण केंद्राचा टोल फ्री क्रमांक १८००२३३३४३५ व १८००२००३४३५ असा आहे. २४ तास ग्राहकांना या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार आहे. महावितरणाचे साधारणत: १ कोटी ५८ लाख घरगुती ग्राहक राज्यामध्ये आहे. वीज पुरवठा खंडीत होणे, वीज बिल जास्त येणे, अशा तक्रारी असतात. त्यासाठी त्यांना महावितरणाच्या नजिकच्या कार्यालयात जाण्याऐवजी घरबसल्या या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर तक्रार नोंदविल्यानंतर ग्राहकांना तक्रार क्रमांक उपलब्ध होतो. तक्रार क्रमांक नोंदविल्याने व तो उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करणे सहज शक्य होत आहे. या क्रमांकावर कुठेही स्पार्कींग होत असल्यास तसेच शॉर्टसर्कीट झाले असल्यास व तत्सम तक्रारी नोंदविणेही शक्य आहे. नवीन वीज कनेक्शन हवे असल्यास योग्य माहिती पुरविली जाते. तक्रारकर्त्या ग्राहकांना त्यांचा ग्राहक क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. ग्राहक क्रमांक वीजबिलावर उपलब्ध असतो. ग्राहकांनी त्यांचे तीन मोबाईल क्रमांक किंवा लॅन्डलाईन क्रमांक व ग्राहक क्रमांक एकदाच नोंदवायचा असतो. त्यामुळे ग्राहकांना तक्रार निवारण केंद्रामधून वारंवार ग्राहक क्रमांकाची विचारणा होत नाही. हे सर्व करण्यासाठी एक पैशाचाही खर्च कॉलसाठी येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)