तज्ज्ञ देणार धडे : पाच दिवसीय कार्यक्रमातून होणार मार्गदर्शनगडचिरोली : लोकमत युवा नेक्स्ट, कल्पतरू बहुउद्देशिय संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा कार्यालय व आर्यन हिरो मोटर्स यांच्या सहकार्याने ९ ते १३ जुलै दरम्यान पाच दिवसीय नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार, चंद्रपूरचे झटपट गणित तज्ज्ञ बालाजी बावणे, पोलीस उपनिरीक्षक दीपा समर्थ, शैलेश खरवडे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ असून सदर कार्यशाळा कल्पतरू बहुद्देशिय संस्थेच्या सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेला जिल्ह्यातील विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कल्पतरू बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष कृणाल पडलवार व लोकमत युवा नेक्स्टच्या संयोजिका वर्षा पडघन यांनी केले आहे. लोकमत युवा नेक्स्टच्या माध्यमातून जिल्ह्यात युवकांच्या बौध्दीक विकासाचे तसेच करीअर मार्गदर्शनाचे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. राज्य पातळीवरही या कार्यक्रमांचे आयोजन युवा नेक्स्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे. युवकांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना १० वी नंतर काय? या विषयावरही मार्गदर्शन केले जात आहे. (शहर प्रतिनिधी)
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
By admin | Updated: July 7, 2014 23:35 IST