शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

शिक्षणाचे व्यापारीकरण घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:11 IST

भाजप सरकारची शैक्षणिक धोरणे बहुजनांसाठी मारक आहेत. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला विरोध करायचा असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या जुन्या सत्ताधाऱ्यांनी अहंकार बाजुला सारून लवचिक व्हायला पाहीजे.

ठळक मुद्देकपिल पाटील । लोकभारती विधानसभा लढणार, भाजपला रोखणे हेच उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजप सरकारची शैक्षणिक धोरणे बहुजनांसाठी मारक आहेत. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला विरोध करायचा असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या जुन्या सत्ताधाऱ्यांनी अहंकार बाजुला सारून लवचिक व्हायला पाहीजे. सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीत एकजुटीने लढावे, अशी अपेक्षा व्यक्त करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात लोकभारतीही आपले उमेदवार उतरविणार, अशी माहिती आ.कपिल पाटील यांनी शनिवारी सायंकाळी येथे पत्रपरिषदेत दिली.शिक्षक भारती या शिक्षकांच्या अराजकीय संघटनेचे नेतृत्व करणारे शिक्षक आमदार पाटील यांनी शनिवारी दुपारी आपल्या लोकभारती या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करून युवक मेळावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी मोठ्या पक्षांनी मोठेपणा दाखवत छोट्या पक्षांनाही सोबत घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आधी काँग्रेसचे धोरण आम्हाला योग्य वाटत नव्हते. पण भाजपचे धोरण त्याहीपेक्षा भयंकर निघाले.या सरकारने राज्यात सर्वाधिक खासगी विद्यापीठ निर्माण केले. ५ हजारावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा वाटल्या. शिक्षणाचे हे व्यापारीकरणच असून यातून सरकारी शाळा बंद केल्या जातील. त्यामुळे त्या शाळांवर असणाऱ्या बहुजन, मागासवर्गीय शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येईल. एवढेच नाही तर बहुजन, मागास गोरगरीब विद्यार्थी खासगी शाळांमधून शिक्षणच घेऊ शकणार नाही अशी व्यवस्था केली जात आहे. वास्तविक सर्व शाळा अनुदानित करून त्यात मराठी हा विषय सक्तीचा करावा, अशी आपली भूमिका असल्याचे आ.पाटील म्हणाले.नक्षलवाद ही आर्थिक समतेची लढाई आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी आधी विषमता संपविली पाहीजे. हिंसेने प्रश्न सुटत नाही. पण इथे मारणारे आणि मरणारे तेच लोक आहेत. नक्षलवाद रोखण्यासाठी शासन जो पैसा खर्च करत आहे तो विकास कामांवर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजेश कात्रटवार, अतुल देशमुख, भाऊराव पत्रे, प्रा.संजय खेडीकर, उमेश उईके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षण