चामोर्शी जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ उपशाच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:34 AM2021-08-01T04:34:23+5:302021-08-01T04:34:23+5:30

मजूर लावून गाळाचा थर काढण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता नगरपंचायत प्रशासनाने शहरात मुनादी देऊन शहरातील पाणीपुरवठा तीन ते चार ...

Commencement of sludge removal work at Chamorshi Water Treatment Plant | चामोर्शी जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ उपशाच्या कामास सुरुवात

चामोर्शी जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ उपशाच्या कामास सुरुवात

Next

मजूर लावून गाळाचा थर काढण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता नगरपंचायत प्रशासनाने शहरात मुनादी देऊन शहरातील पाणीपुरवठा तीन ते चार दिवस बंद राहील अशी सूचना दिली. २५ ते २५ दिवसांपासून नळाला गढूळ व चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा होत होता; परंतु गाळ काढल्यानंतर चार ते पाच दिवसांनंतर शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे.

(बॉक्स)

१५ वर्षे जुनी यंत्रसामग्री

जलशुद्धीकरण निर्मितीला १५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असून, जलशुद्धीकरण केंद्रात असलेल्या विविध यंत्रांची झीज होत आहे. त्यामुळे त्या यंत्रात बिघाड येऊन पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणी पिण्याची वेळ येत आहे. शुद्ध पाणी करणारे बेड चोकअप झाल्याने पाणी शुद्ध करण्यास अडथळा निर्माण होत होता, त्याची दुरुस्ती करूनशुद्धा पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती नगरपंचायतीचे अभियंता निखिल कारेकर यांनी दिली.

310721\img-20210730-wa0135.jpg

गाळ उपसा फोटो

Web Title: Commencement of sludge removal work at Chamorshi Water Treatment Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.