लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेत गडचिरोली शहराचा राज्यातून १८६ वा क्रमांक आहे. तर देसाईगंजची स्थिती थोडीफार चांगली असून या शहराचा १५० वा क्रमांक आहे.शहरवासीयांना स्वच्छतेचे महत्त्व कळून ते स्वत: स्वच्छता राखण्यासाठी तयार व्हावे, या उद्देशाने स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविला जात आहे. याच अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ही स्पर्धा घेण्यात आली होती. गडचिरोली व देसाईगंज हे दोन शहरे सहभागी झाले होते. ही दोन्ही शहरे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या वर्गवारीत मोडतात. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले राज्यातील एकूण २०८ शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र गडचिरोली व देसाईगंज शहराची स्थिती अतिशय वाईट आहे. गडचिरोली शहराला २३२६ गुण मिळाले आहेत. गडचिरोली शहराचा राज्यातून १८६ वा क्रमांक आहे. देसाईगंज शहराला २४४७ गुण मिळाले आहेत. राज्यातून या शहराचा १५० वा क्रमांक आहे. विशेष म्हणजे, दोन्ही शहरे पहिल्या १०० मध्ये सुध्दा येऊ शकली नाही. या स्पर्धेत क्रमांक पटकावण्यासाठी या दोन्ही शहरांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
स्वच्छतेत देसाईगंजने गडचिरोलीला टाकले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:38 IST
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेत गडचिरोली शहराचा राज्यातून १८६ वा क्रमांक आहे. तर देसाईगंजची स्थिती थोडीफार चांगली असून या शहराचा १५० वा क्रमांक आहे.
स्वच्छतेत देसाईगंजने गडचिरोलीला टाकले मागे
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण : गडचिरोलीचा १८६ तर देसाईगंजचा १५० वा क्रमांक