शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून कालव्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत कुरखेडा येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाचा जलशक्ती व मतदान जनजागृतीसाठी युवाशक्ती या विषयावर विशेष शिबिर दत्तक ग्राम जांभूळखेडा येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून श्रमसंस्कृती रुजविण्याच्या अनुषगांने मंगळवारला रासेयो पथकातील १०८ स्वंयसेवकानी क्षतीग्रस्त झालेल्या सिंचन तलावाचा कालवा दुरुस्तीचा उपक्रम हाती घेतला. 

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील जांभूळखेडा सिंचन तलावाच्या कालव्यात गाळ व कचरा साचल्यामुळे पाण्याचा निकासी मार्गावर अवरोध निर्माण होत होते. सदर बाब येथील मुनघाटे महाविद्यालयाच्या रासेयो पथकाच्या निदर्शनास येताच विद्यार्थ्यांनी मंगळवारला श्रमदानातून कालव्याची स्वच्छता व डागडुजी केली. त्यामुळे तलावाचे पाणी आता शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यास सोयीस्कर होणार आहे.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत कुरखेडा येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाचा जलशक्ती व मतदान जनजागृतीसाठी युवाशक्ती या विषयावर विशेष शिबिर दत्तक ग्राम जांभूळखेडा येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून श्रमसंस्कृती रुजविण्याच्या अनुषगांने मंगळवारला रासेयो पथकातील १०८ स्वंयसेवकानी क्षतीग्रस्त झालेल्या सिंचन तलावाचा कालवा दुरुस्तीचा उपक्रम हाती घेतला. या सिंचन तलावाअंतर्गत जांभूळखेडा, येरंडी व गोठणगाव येथील शेतजमीन येते. सदर उपक्रम रासेयो पथकाने प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गुणवंत वडपल्लीवार, प्रा. डॉ. रवींद्र विखार, डॉ. संदीप निवडंगे, डॉ. राखी शंभरकर, जांभूळखेडाचे सरपंच राजबत्ती नैताम, उपसरपंच गणपत बंसोड, पोलीस पाटील नंदेश्वर, प्रल्हाद धोंडणे, वासुदेव दाजगाये, धनराज गहाणे यांच्या मार्गदर्शनात राबविला.

आता पाणी थेट शेतापर्यंत पोहोचणार-    जवळपास एक किलोमीटर असलेल्या कालव्यातील साचलेला गाळ स्वच्छ करत विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी खचलेल्या कालव्याची पाळ दुरुस्त केली. कालव्यात पडलेले माती, गोटे बाहेर काढत पाण्याच्या निचऱ्यासाठी अडलेला मार्ग मोकळा केला. सदर कालव्याची स्वच्छता व दुरुस्ती झाल्याने तलावाचे पाणी थेट शेतापर्यंत पोहोचण्यास सोयीचे होणार आहे.-    युवाशक्ती एकत्र आली की, काेणतेही कार्य सहज पार पडते, असाच अनुभव कालवा दुरूस्तीच्या कामात ग्रामस्थांना आल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प