शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी जंगलात प्रवेश करू नये

By admin | Updated: May 21, 2017 01:31 IST

आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, अरसोडा, कासवी, कोंढाळा, मुल्लुर, कनेरी या क्षेत्रात दीड महिन्यापासून वाघाचे वास्तव्य आहे.

वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे आवाहन : वाघाचा वावर वाढला लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, अरसोडा, कासवी, कोंढाळा, मुल्लुर, कनेरी या क्षेत्रात दीड महिन्यापासून वाघाचे वास्तव्य आहे. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन इसमांना जीव गमावावा लागला आहे. वाघाचा वावर वाढला असल्याने नागरिकांनी जंगलात जाऊ नये, असे आवाहन आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी केले आहे. अरसोडा, रवी, कोंंढाळा, कासवी परिक्षेत्रात वैनगंगा नदी, नाले, वनतलाव, इटियाडोहाचे बारमाही वाहणारे पाणी यामुळे या भागात हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे. परिसरात रानडुकरांचे प्रमाण वाढले आहे. वाघाला आवश्यक असलेले खाद्य व पाणी तसेच सुरक्षित आश्रयस्थान या भागात असल्याने वाघाचे वास्तव्य व वावर वाढला आहे. वाघाच्या भीतीमुळे जंगलातील रानडुकर स्वत:चे आश्रयस्थान सोडून सैरावैरा पळत आहेत. कुड्याची फुले, झाडूच्या काड्या, सरपण, तेंदूपत्ता आणण्यासाठी गेलेले नागरिक वाघाचे बळी पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या भागात गस्तीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. वाघाला पकडण्यासाठी रवी परिसरात दोन पिंजरे लावले आहेत. १३ ट्रॅपिंग कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व देसाईगंजचे उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. वाघाला पकडण्यासाठी वन विभाग शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी रात्री मोटारसायकलने फिरू नये, सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत वातावरणात थंडावा राहत असल्याने वाघ बाहेर निघू शकतो, या कालावधीत नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी, वनरक्षक एस. के. सय्यद, सतीश गजबे, एस. जी. झोडगे उपस्थित होते.