शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

ग्रामपंचयातमधील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांकडूनही नागरिकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST

खासगी केंद्रचालकांबराेबरच ग्रामपंचायतमध्येही विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील केंद्रचालकाला ग्रामपंचायतीमार्फत स्वतंत्र खाेली, वीज व इतर सुविधा पुरविल्या जातात. तसेच त्याला शासनामार्फत मानधनही दिले जाते. गावातील एखादा व्यक्ती जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व इतर दस्तावेज काढण्यासाठी आला तर शासकीय दराप्रमाणेच शुल्काची आकारणी करणे आवश्यक आहे. मात्र संगणक ऑपरेटर संबंधित नागरिकाकडून १०० ते २०० रुपये वसूल करतात. 

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील जवळपास ४०० ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालविले जाते. खासगी केंद्रांप्रमाणेच या केंद्रांमध्येही नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणापत्र काढून देण्याची सुविधा आहे. मात्र या केंद्रातील चालकही नागरिकांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. खासगी केंद्रचालकांबराेबरच ग्रामपंचायतमध्येही विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील केंद्रचालकाला ग्रामपंचायतीमार्फत स्वतंत्र खाेली, वीज व इतर सुविधा पुरविल्या जातात. तसेच त्याला शासनामार्फत मानधनही दिले जाते. गावातील एखादा व्यक्ती जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व इतर दस्तावेज काढण्यासाठी आला तर शासकीय दराप्रमाणेच शुल्काची आकारणी करणे आवश्यक आहे. मात्र संगणक ऑपरेटर संबंधित नागरिकाकडून १०० ते २०० रुपये वसूल करतात. ग्रामीण भागातील नागरिक शासकीय दराबाबत अनभिज्ञ राहतात. याचा गैरफायदा संगणक ऑपरेटरकडून घेतला जात आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांना तालुकास्थळी जावे लागू नये, गावातच साेय व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र तेसुद्धा लूट करीत आहेत.

सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष द्यावेसंगणकचालक हा ग्रामपंचायतमध्येच बसतो. त्याच्या सर्व कार्यावर ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष असायला पाहिजे. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी किती रुपये आकारले जातील याचा दरफलक ग्रामपंचायतीसमाेर लावायला पाहिजे, तशी सक्ती सरपंचांनी संगणकचालकाला करावी. मात्र सरपंच व ग्रामपंचायत सदस्य शासकीय दराबाबत अनभिज्ञ असल्याने संगणक ऑपरेट आपल्या मनमर्जीने दर आकारून नागरिकांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. 

खाेली, वीज ग्रामपंचायतीची, चालकाला मानधनही मिळतेग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या आपले सरकार केंद्र चालकाला ग्रामपंचायतीत खाेली उपलब्ध करून दिली जाते. वीजही ग्रामपंचायतीची वापरली जाते. तसेच संगणकचालकाला शासनामार्फत मानधनही दिले जाते. त्यामुळे ५८ रुपयांना प्रमाणपत्र काढून देणे परवडत नाही, हा मुद्दाच शिल्लक राहत नाही. जाे शासकीय दर आहे, तेवढेच दर आकारणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत