शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या तुटवड्याने शहरातील नागरिक हैराण

By admin | Updated: October 20, 2014 23:12 IST

शहरातील हजारो कुटुंब स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यानुसार शहरासह परिसरातील नागरिकांना दररोज ४०० ते ५०० सिलिंडरची आवश्यकता भासते. परंतु प्रतीदिवस केवळ

ंगडचिरोली : शहरातील हजारो कुटुंब स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यानुसार शहरासह परिसरातील नागरिकांना दररोज ४०० ते ५०० सिलिंडरची आवश्यकता भासते. परंतु प्रतीदिवस केवळ ५० सिलिंडर देण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत असल्याने अनेक नागरिकांना गॅस सिलिंडरपासून वंचित राहावे लागत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा वाढविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. शहरात गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. परिणामी नागरिकांना रॉकेल, सरपणावर स्वयंपाक करावा लागत आहे. जिल्हा वनाने संपन्न असल्याने मोठ्या प्रमाणात सरपणाची व्यवस्था जंगलातून होऊ शकते, परंतु सरकारने पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा ध्यास घेतल्यामुळे धूरविरहीत इंधनाचा वापर करणे नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी भरपूर प्रमाणात सरपणाचा वापर केला जातो. परंतु गडचिरोली शहरात सरपणाचा वापर करणे नागरिकांना शक्य नाही. शहरात हजारो कुटुंबियांकडे गॅस सिलिंडर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम शहरातील नागरिक करत आहेत. परंतु गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शहरातील नागरिकांची वाताहत होत आहे. संबंधीत एजन्सीकडून दर दिवशी ५० सिलिंडर देण्याचे प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे सकाळपासूनच अनेक नागरिक एजन्सीसमोर रांगा लावून उभे राहत असल्याचे अनेक दिवसांपासूनचे चित्र आहे. रात्रीपासूनच सिलिंडरसाठी नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. गॅस एजन्सी सकाळी ९ ते १० वाजता सुरू होत असल्याने नागरिकांना सिलिंडर दुपारपर्यंत मिळतो. ५० हून अधिक असलेल्या ग्राहकांना रांगेत उभे राहूनही परत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे. त्याबरोबरच त्रासही सहन करावा लागत आहे. नगर परिषदेचे सभापती संजय मेश्राम व अजय भांडेकर यांनी पुरवठा अधिकाऱ्यांची विचारणा केली असता, कम्प्युटर सॉफ्टवेअरमधून केवळ ५० पावत्यांचे नियोजन असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे सांगितले. दररोज नागरिकांना गॅस एजन्सीसमोर ताटकळत उभे राहून सिलिंडरची मागणी करावी लागत आहे. ५० हून अधिक असलेल्या ग्राहकांना सकाळपासून रांगेत राहूनही शेवट परत जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्य:स्थितीत दिवाळी सण जवळ येऊन ठेपल्याने शहरातील नागरिकांना गॅस सिलिंडरचा वाढीव पुरवठा करावा, अशी मागणी न. प. चे सभापती संजय मेश्राम, अजय भांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)