शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

चिमुकल्यांचा सुट्टी मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST

गडचिराेली : इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यात टप्प्याटप्प्याने परवानगी दिली आहे; मात्र त्याखालील ...

गडचिराेली : इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यात टप्प्याटप्प्याने परवानगी दिली आहे; मात्र त्याखालील वर्ग प्रत्यक्ष भरविण्याबाबत काेणत्याही सूचना विभागाकडून देण्यात आल्या नाहीत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली असली तरी पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू हाेण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा विसर पडत असून चिमुकल्यांचा मूड आता सुट्टी घेण्याचाच दिसून येत आहे.

दहा वर्षांपेक्षा कमी वयाेगटातील मुला, मुलींना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता अधिक आहे. तर १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना सध्या कमी धाेका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे चिमुकली मुले, मुली अजूनही अभ्यासाला लागली नाहीत. यामुळे पालक व शिक्षक हैराण झाले आहेत.

ऑनलाइन शिक्षणामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची हेळसांड झालेली आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांच्या अभ्यासाचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. लहान वयात एकमेकांच्या सहवासातून, शिक्षकांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनातून विद्यार्थी-संकल्पना, अक्षर ओळख शिकतात. त्यांच्यापासून ते वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्र करणे, समरस करणे, शिक्षकांसाठी माेठे आव्हान ठरत असल्याचे दिसून येत आहे.

वर्गात असताना इतर मुलांसाेबत कविता म्हणणे, अक्षर, प्राणी यांची ताेंड ओळख हाेणे या गाेष्टी विद्यार्थ्यांसाठी सहज, साेप्या हाेत असतात; मात्र ऑनलाइन शिक्षणात मुलांना त्यांचा कंटाळा येत असल्याने मुलांचा शिक्षणाचा पाया कच्चा राहू शकताे.

बाॅक्स...

पालकांनी घरातच घ्यावी शाळा...

- सद्य:स्थितीत काेराेनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी हाेत असला तरी धाेका मात्र टळलेला नाही. सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.

- खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना तरी शाळेत पाठविणे म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेला धाेक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना घरूनच शिकू द्यावे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

- ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यास आणखी काही महिने तरी करू द्यावा. विद्यार्थ्यांना विविध कामातून, गप्पागाेष्टीतून नवीन संकल्पना व विषय समजून द्यावेेत, असे तज्ज्ञ पालकांना सल्ला देत आहेत.

बाॅक्स...

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

- ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा अभ्यास पूर्णपणे घरातून हाेत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी आणि शिकविण्यासाठी सतत त्यांच्यासाेबत असणे तसेच वेळ घालविणे पालकांना गरजेचे झाले आहे.

- अनेकदा मुले ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली गेम खेळताना, कार्टून व्हिडिओ बघताना दिसत असल्याच्या तक्रारी अनेक पालक करीत आहेत. गडचिराेली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बऱ्याच अडचणी आहेत.

- अनेक मुले ऑनलाइन वर्गांना बसतात; मात्र शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास किंवा गृहपाठ करण्यासाठी ते टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येतात.

- प्रत्यक्षात शाळा सुरू असताना किमान चार ते पाच तास शाळेत असणारी ही मुले घरी असताना मात्र कुणीतरी आले, पाणी द्यायचे आहे, भूक लागली आहे, सु लागली असल्याचे कारण सांगून वारंवार उठत असतात. ऑनलाइन अभ्यासाचा विद्यार्थी कंटाळा करीत आहेत.

बाॅक्स...

मुलांना अक्षर ओळख हाेईना

- ऑनलाइन वर्ग व प्रत्यक्ष शाळांमधील वर्ग यामध्ये प्रचंड तफावत आहे.

- ऑनलाइन वर्गाला नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना याेग्य ऐकू येत नाही.

- संकल्पना पूर्णपणे कळत नाही.

- इंग्रजी, मराठी, गणित, विज्ञान आदी विषयांच्या विविध क्लिष्टबाबी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना समज नसल्याचे दिसते.

बाॅक्स...

पालकांची अडचण वेगळीच

मला दाेन मुले असून दाेघांचे प्रवेश शाळेत घेतले आहेत. मात्र आमच्या घरी एकच स्मार्ट फाेन असल्याने व दाेन्ही मुलांचे ऑनलाइन वर्ग एकाचवेळी असल्याने प्रचंड अडचण येत आहे. अनेकदा ऑनलाइन वर्गांना पूर्णवेळ उपस्थित राहावे लागत असल्याने इतर कामाकडे दुर्लक्ष हाेत आहे. शिवाय कव्हरेेजचीही समस्या असल्याने झुमवरील वर्ग सलग चालत नाही.

- प्रियंका चाैधरी, पालक

...............

शाळेच्या ऑनलाइन वर्गाच्या वेळी पालक उपस्थित न राहिल्यास मुले गेम खेळतात. कार्टून बघत असल्याचे दिसून येते. ऑनलाइन वर्ग याेग्यरित्या पूर्ण करून घेण्यासाठी वर्ग संपेपर्यंत त्यांच्यासाेबत बसावे लागत आहे. परिणामी घरातील कामे रखडून पडत आहेत. ऑनलाइन शिक्षणात पालकांसह मुला-मुलींना अनेक अडचणी येत आहेत.

- मनाेहर तलांडी, पालक