शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

निसर्गाच्या सान्निध्यात बच्चेकंपनीने केली धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

गडचिराेली तालुक्यातील चांदाळा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर आश्रमशाळेत शनिवार व रविवारी असे दोन दिवस हे अनोखे शिबिर पार पडले. या ...

गडचिराेली तालुक्यातील चांदाळा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर आश्रमशाळेत शनिवार व रविवारी असे दोन दिवस हे अनोखे शिबिर पार पडले. या शिबिरात वसंत विद्यालय, पंडित जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, कमलताई मुनघाटे हायस्कूल आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. टीव्हीनंतर मोबाइलचे युग सुरू झाल्यावर बालकांची कंचे, लगोरी, टिक्करगोटी, सायकलचे टायर फिरवणे, चौका-अष्टा, किल्ले तयार करणे अशा अनेक खेळांपासून ताटातूट झाली. त्यामुळे मोबाइलचे डबडे काही काळ दूर ठेवून पुन्हा जुन्या खेळांत बालकांनी रमावे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मुले मामाच्या गावाला जाऊन धमाल करायची. म्हणून चांदाळा येथील आश्रमशाळेतच हे मामाचे गाव तयार करण्यात आले. येथे मुलांसाठी उभारलेले तंबू या शिबिराचे खास वैशिष्ट्य होते. या शिबिराच्या पहिल्या दिवशी शिबिरार्थींना पाटावर उभे करून त्यांना हातपाय धुवायला सांगितले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने टिळा लावून औक्षण करण्यात आले. तसेच अनेक पारंपरिक खेळांसह डॉ. विनोद बिटपल्लीवार यांनी लँड स्केपिंग हा चित्रकलेचा प्रकार मुलांना शिकविला. विशेष म्हणजे, त्यांनी मुलांपुढेच एक लाइव्ह चित्र काढून दाखवले. कोंबडीची पिसे आणि दाभणाचा वापर करून डार्ट तयार करत कलिंगडावर नेम धरण्यात आला. शिवाय गुलेर, कंचे आदींची व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळी गावालगत वनभ्रमंती करण्यात आली. यावेळी बहरलेल्या पळस वृक्षांमध्ये फिरताना मुलांनी खाली पडलेली पळस फुले गोळा केली. यावेळी त्यांना पळसाचे आयुर्वेदिक महत्त्व व अनेक उपयोग सांगण्यात आले. त्यानंतर मुलांनी मातीचे सुबक किल्लेही तयार केले. रात्री निसर्ग अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, जीवाश्म आदींची सविस्तर माहिती दिली. काही सत्र रात्री छोटी शेकोटी पेटवून कॅम्प फायरमध्ये घेण्यात आली. यावेळी शिबिरार्थींशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. त्यानंतर पारंपरिक नृत्याचाही सर्वांनी आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी चित्रकार अनिल बारसागडे यांनी वारली पेंटिंग शिकवली. या चित्रकला वर्गात मुलांनी पेंटिंग शिकून लगेच शाळेच्या भिंतींवर सुरेख वारली चित्रांची पेंटिंगसुद्धा केली. या शिबिरात मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, क्रेन्स संस्थेच्या सचिव अंजली कुळमेथे, मुख्याध्यापक शेमदेव चाफले, सुधीर गोहणे, शिक्षिका मीरा बिसेन-चौधरी यांनी शिबिर संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली. शिबिरासाठी प्राचार्य सागर म्हशाखेत्री, शरद डोके, आतिश उरकुडे, खुशाल ठाकरे आदींनी सहकार्य केले.

बाॅक्स

वनभ्रमंतीचा आनंद....

दुसऱ्या दिवशी जागतिक वनदिनानिमित्त वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके यांनी शिबिरार्थींसाठी वनभ्रमंती आयोजित करून हे शिबिर अविस्मरणीय केले. गुरवळा गावाजवळच्या जंगल परिसरात जवळपास ३६ किमी अंतर वाहनांतून भटकंती करत शिबिरार्थींनी चितळ, नीलगाय, भेकर, रानकुत्रे असे अनेक वन्यजीव व विविध पक्ष्यांचे निरीक्षण केले. या वनभ्रमंतीमुळे शिबिरार्थींना निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन विविध प्रकारची माहिती जाणून घेता आली. यावेळी सर्वांनी वनसंवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.