शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल चळवळीची मुख्य सूत्रधार गजाआड, गडचिरोली पोलिसांची कारवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 03:22 IST

गडचिरोली पोलिसांची कारवाई : नर्मदाक्का व तिच्या पतीला कोठडी

गडचिरोली : नक्षल चळवळीची मुख्य सूत्रधार नर्मदाक्का ऊर्फ निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदादीदी (५८) रा.कोडापावनुरू जि.कृष्णा (आंध्रप्रदेश) व तिचा पती नक्षलवाद्यांच्या पब्लिकेशनचा प्रमुख किरण ऊर्फ सत्यनारायणा (७०) रा.नरेंद्रपुरम (आंध्रप्रदेश) या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चार ते पाच महिन्यांपासून पोलीस नर्मदाक्का व तिच्या साथीदारांच्या मागावर होते. तेलंगणा राज्यातून नर्मदाक्का व तिचा पती किरण हे दोघेही सोमवारी सिरोंचामार्गे गडचिरोली जिल्ह्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. तेलंगणा पोलिसांच्या मदतीने सिरोंचात सापळा रचण्यात आला. सिरोंचा येथील बसस्थानकावर सिव्हील ड्रेसवर नर्मदाक्का व तिचा पती वाहनाची प्रतीक्षा करीत होते. मागावरच असलेल्या गडचिरोली पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. ११ जून रोजी रात्री तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गडचिरोली न्यायालयाने या दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांवरही प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. नर्मदाक्का ही मागील २५ ते ३० वर्षांपासून नक्षल चळवळीतील वरिष्ठ कॅडरची नक्षलवादी आहे. अनेक मोठ्या हिंसक घटना तिच्याच मार्गदर्शनात नक्षलवाद्यांनी घडवून आणल्या. सात दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान नक्षल चळवळीविषयीची बरीचशी माहिती पोलिसांना उपलब्ध होईल. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले.कोण आहे ही नर्मदाक्का?नर्मदाक्का ही नक्षल चळवळीच्या वरिष्ठ कॅडरची व अत्यंत निष्ठूर म्हणून ओळखली जाणारी नक्षलवादी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विविध हिंसक घटनांबाबत तिच्या विरोधात ६५ गुन्हे दाखल आहेत. १ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथील भुसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. या घटनेची जबाबदारी नक्षलवाद्यांच्या पश्चिम रिजनल ब्युरोने घेतली होती. या ब्युरोची नर्मदाक्का ही प्रमुख आहे. नक्षल चळवळीची मुख्य सूत्रधार असलेल्या नर्मदाक्काला तपासादरम्यान पोलिसांनी नक्षल चळवळीमुळे दुर्गम व आदिवासी भागाचा विकास झाला काय? किंवा भविष्यात होणार आहे काय? असाप्रश्न केला असता, ती निरूत्तर झाली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारी