शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

छत्तीसगडच्या सीमाबंदीचा कोरची तालुक्यातील गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:00 AM

कोरची-कोटगूल हा जवळपास ३० किमीचा मुख्य मार्ग आहे. या मार्गात मध्येच छत्तीसगड राज्यातील गावे येतात. लॉकडाऊन नंतर प्रत्येक राज्याने स्वत:च्या सीमा सील केल्या आहेत. त्यानुसार छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूलच्या दरम्यान असलेल्या गावांमध्ये चेक पोस्ट बसविले आहे. त्यामुळे कोटगूल परिसरातील नागरिकांना कोरची येथे येणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देचेक पोस्ट उभारले : कोरची-कोटगूल मार्गावरील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूल मार्गावरील सीमांवर चेकपोस्ट बसवून नाकेबंदी केली आहे. त्यामुळे कोटगूल परिसरातील नागरिकांची अडचण वाढली आहे.कोरची-कोटगूल हा जवळपास ३० किमीचा मुख्य मार्ग आहे. या मार्गात मध्येच छत्तीसगड राज्यातील गावे येतात. लॉकडाऊन नंतर प्रत्येक राज्याने स्वत:च्या सीमा सील केल्या आहेत. त्यानुसार छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूलच्या दरम्यान असलेल्या गावांमध्ये चेक पोस्ट बसविले आहे. त्यामुळे कोटगूल परिसरातील नागरिकांना कोरची येथे येणे कठीण झाले आहे. कोरची तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांना विविध कामे व अत्यावश्यक सेवांसाठी कोरची येथे यावे लागते. मात्र छत्तीसगड राज्याने चेकपोस्ट उभारल्याने कोटगूल परिसरातील नागरिकांना कोरची येथे येणे अशक्य झाले आहे. खुराणा गावावरून दुसरा मार्ग जातो. मात्र सदर मार्ग सुध्दा बंद करण्यात आला आहे. सरकारमार्फत ग्रामीण भागात राशन पुरविले जात आहे. मात्र रस्त्यावरच झाडे पाडून ठेवल्याने राशनचा पुरवठा करणारी वाहने नेण्यास अडचण जात आहे. कोटगूल परिसरातील कार्यरत असलेले डॉक्टर, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांना सुध्दा या मार्गाने जाऊ देण्यास गावातील नागरिक तसेच छत्तीसगडचे अधिकारी तयार नाहीत.गावकऱ्यांनी झाडे कापून अडविला मार्गकोरची-कोटगूल मार्गावर छत्तीसगड राज्यातील भुरकुंडी, पाटण, बंजारी आदी गावे येतात. कोरोनाचा प्रसार आपल्या गावात होऊ नये, यासाठी या गावांमधील नागरिकांनी कोरची-कोटगूल मुख्य मार्गावरच मोठमोठी झाडे कापून मार्ग अडविला आहे. रस्त्यावर लाकडे पडली असल्याने रूग्णवाहिका सुध्दा कोरची येथे आणणे कठीण झाले आहे. या गंभीर परिस्थितीकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी कोटगूल परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस