शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिबळ खेळाने एकाग्रता वाढते

By admin | Updated: March 6, 2017 00:40 IST

बुद्धिबळ खेळात सतत डोके लावावे लागते.त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता व आत्मविश्वास वाढण्यास फार मोठी मदत होते.

नगराध्यक्षांचे प्रतिपादन : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बुद्धिबळ स्पर्धागडचिरोली : बुद्धिबळ खेळात सतत डोके लावावे लागते.त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता व आत्मविश्वास वाढण्यास फार मोठी मदत होते. त्यामुळे असे खेळ आयोजित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.गडचिरोली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंकरिता बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष सतीश आयलवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, डॉ. प्रशांत चलाख, गडचिरोली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, अमित सूचक, सचिव हेमप्रकाश बारसागडे, कोषाध्यक्ष किरण सांबरे, सदस्य तानाजी भुरसे, गिरीष नरड, अरूण पत्रे, चंद्रशेखर तोटावार आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे २०० स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद पिपरे म्हणाले की, गडचिरोली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन ही महाराष्ट्र चेस अ‍ॅन्ड हॉक कमिटीला संलग्न असल्यामुळे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना राज्यस्तरीय व अखिल भारतीय बुध्दीबळ स्पर्धामध्ये भाग घेण्यास वाव मिळणार आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा यापुढेही आयोजित केल्या जातील, असे मार्गदर्शन केले.प्रास्ताविकातून असोसिएशनचे अध्यक्ष सतिश आयलवार म्हणाले की, बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाणार आहे. तालुकास्तरावर सुध्दा स्पर्धा आयोजित करून जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे मार्गदर्शन केले. संचालन व आभार आर. वाय. सोरते यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)