शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चव्हेला पुनर्वसनाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:29 IST

आरमोरी तालुक्याच्या मानापूर/देलनवाडी परिसरातील कोसरी सिंचन प्रकल्प रखडला होता. मोबदला कधी मिळणार, कोठरी प्रकल्पाचे पाणी कधी मिळणार, अशा अनेक प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

ठळक मुद्देसिंचन प्रकल्पाचा मार्ग मोकळा : पाणी योजना व घरांचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मानापूर/देलनवाडी परिसरातील कोसरी सिंचन प्रकल्प रखडला होता. मोबदला कधी मिळणार, कोठरी प्रकल्पाचे पाणी कधी मिळणार, अशा अनेक प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कोसरी सिंचन प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे या भागातील शेती सुजलाम, सुफलाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी २३ वर्षांपूर्वी कोसरी (चव्हेला) हा लघु सिंचन प्रकल्प मंजूर केला होता. सदर प्रकल्पाचे नियोजनही पूर्ण झाले होते. मात्र सन १९८० च्या वनकायद्यामुळे हा प्रकल्प व पुनर्वसनाचे काम रखडले होते. तत्कालीन जलसंपदा मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या काळात हा प्रकल्प मंजूर झाला होता. कोसरी लघु पाटबंधारे योजनेमुळे बाधित होणाऱ्या वनक्षेत्राच्या मोबदल्यात वनविभागाकडे ८०२ लाख रूपये इतकी एनपीव्हीची रक्कम भरण्यात आली होती. सदर योजनेमुळे या भागातील ७७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र पुनर्वसनाच्या सबबीखाली हा सिंचन प्रकल्प रखडला होता. पुणे, मुंबईच्या धर्तीवर ज्या प्रमाणात मोबदला दिला जातो, त्याच प्रमाणात आम्हाला जवळपास ८ ते १० लाख रूपये मोबदला देण्यात यावा, अशी मागणी या भागातील बाधित नागरिकांनी केली होती.२०११ मध्ये प्रत्यक्ष या प्रकल्पाचे सुरू करून हे काम ९० टक्क्यांवर पोहोचविण्यात आले. केवळ गेट बसविण्याचे काम शिल्लक राहिले आहे. आता सर्व प्रश्नांचे निराकरण होऊन जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मोबदला म्हणून भराची रक्कम बाधित नागरिकांच्या खात्यात येत्या एक-दोन दिवसात जमा होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गेटचे काम सुरू होऊन सदर प्रकल्प १०० टक्के पूर्ण होईल. यातून सिंचन व्यवस्था निर्माण होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.ही कामे प्रगतीपथावरवसाहतीसाठी मानापूर-अंगारा रस्त्याजवळ कोसरीलगत वसाहत निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाण्याची टाकी उभारण्यात आली असून येथे अंगणवाडी सार्वजनिक सभागृह व नाली तसेच रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.