शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी व घोटला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:29 IST

चामोर्शी, एटापल्ली तालुक्यासह घोट परिसर व जिल्ह्याच्या अनेक भागात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी पाऊस बरसला. वादळामुळे एटापल्ली-चामोर्शी तालुक्यात अनेक घरांचे छत कोसळले. तसेच झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

ठळक मुद्देघराची टिनपत्रे उडाली, झाडे कोसळली : घोट परिसरातील वीज पुरवठा खंडित, एटापल्लीतही पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/एटापल्ली/घोट : चामोर्शी, एटापल्ली तालुक्यासह घोट परिसर व जिल्ह्याच्या अनेक भागात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी पाऊस बरसला. वादळामुळे एटापल्ली-चामोर्शी तालुक्यात अनेक घरांचे छत कोसळले. तसेच झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. घोट परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.चामोर्शी शहरात सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसला. वादळामुळे तेलंग मोहल्ला वार्ड नंबर २ मधील अशोक कस्तुरे यांच्या बाथरूमचे टिनपत्रे उडाली. वादळामुळे दिना विश्राम गृहानजीक क्वॉटर नजीकच्या झाडाच्या फांद्या क्वॉटरवर कोसळल्या. यामुळे क्वॉटरसमोरील सिमेंट पत्रे तुटून पडले. यामुळे एस.एम. गेडाम यांच्या घरातील साहित्यांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. नुकसानीमुळे गेडाम यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन क्वॉटरची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. घोट परिसरातील निकतवाडा, नवेगाव, कर्दुळ, दर्पणगुड्डा, वरूळ, गांधीनगर, चापलवाडा, कोतेपल्ली येथील घरांचे नुकसान झाले. निकतवाडा येथील घरांचे छत वादळाने उडाले. घोट रेगडी मार्गावर झाडे कोसळली. आंब्याचेही मोठे नुकसान झाले. एटापल्ली व मुलचेरा तालुक्यासही वादळी पावसाचा फटका बसला.

टॅग्स :Rainपाऊस