शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

मातृ-पितृछत्र हरविल्याने चंद्रशेखर व तुषार झाले पोरके

By admin | Updated: August 15, 2016 00:44 IST

आई-वडील म्हणजे जणू बालपणातील अवघे विश्वच. वडिलांचा आधार अन् आईची ममता बालमनाला सदैव हवीहवीशी वाटते,

चिमुकल्यांवर ओढवले संकट : आधारवड कोसळला अन् ममताही कायमची मुकीअतुल बुराडे विसोराआई-वडील म्हणजे जणू बालपणातील अवघे विश्वच. वडिलांचा आधार अन् आईची ममता बालमनाला सदैव हवीहवीशी वाटते, मात्र पित्याचे आधारवड कोसळण्यापाठोपाठ मायेची ममताही कायमची मुकी झाल्याने कवी यशवंत यांच्या ‘आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या कवितेच्या ओळी आठविल्याशिवाय राहत नाही. विसोरा येथील रहिवासी चंद्रशेखर नाकतोडे व तुषार नाकतोडे ही दोन्ही मुले मातृ-पितृछत्र हरविल्याने पोरके झाले आहेत.देसाईगंज तालुक्याच्या विसोरातील सीताबर्डी येथील प्रतिभा उर्फ अर्चना पुरूषोत्तम नाकतोडे यांचा १२ आॅगस्ट रोजी शुक्रवारी स्वत:च्या शेतात सर्पदंशाने मृत्यू झाला. पित्याच्या निधनानंतर तीन वर्षातच आईने सुध्दा जग सोडले. त्यामुळे १५ वर्षीय चंद्रशेखर व ११ वर्षीय तुषार ही दोन्ही मुले आता निराधार झाली आहेत.१७ वर्षापूर्वी विसोरा येथील पुरूषोत्तम नाकतोडे व भंडारा जिल्ह्याच्या जुगनाळा येथील अर्चना तुळशीराम ढोरे यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांच्या जीवनवेलीवर चंद्रशेखर व तुषार ही दोन मुले उमलली. सर्व काही सुरळीत चालू असताना प्रतिभाच्या जीवनात मोठे संकट आले. तीन वर्षापूर्वी विसोरा येथे झालेल्या एका रस्ते अपघातात पुरूषोत्तमचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरूषोत्तमच्या निधनाने प्रतिभा पूर्णत: कोसळून गेली. दुसरीकडे चंद्रशेखर व तुषार वडिलांच्या जाण्याने वडील प्रेमास कायमची मुकली. मात्र या आभाळाएवढ्या संकटातून ‘प्रतिभा’ ही आपल्या प्रतिभेच्या जोरावर बाहेर पडली. शेती व्यवसायासह मोलमजुरी करून दोन मुलांसह जीवन कंठत होती. पित्याच्या प्रेमापासून दूर झालेल्या मुलांवर आई व वडील अशा दुहेरी भूमिकेतून प्रतिभा ही चंद्रशेखर व तुषार यांचे पालनपोषण व सांभाळ करीत होती. मात्र १२ आॅगस्ट शुक्रवार हा दिवस प्रतिभा, चंद्रशेखर आणि तुषार यांच्या जीवनातील काळा दिवस ठरला. नेहमीप्रमाणे प्रतिभा ही काम करण्यासाठी शेतावर गेली. तुषार शाळेत गेला. सायंकाळी तुषार शाळेतून घरी परतल्यावर आईची प्रतीक्षा करीत बसला. अस्ताला जाणाऱ्या सूर्यदेवामुळे काळोख जसजसा पसरत होता, अगदी तशीच तुषारची आईप्रतीची आतुरता अधिक दाट होऊ लागली. अखेर अंधार होऊनही आई शेतावरून घरी न परतल्याने तुषार काळजीत पडला. लागलीच तुषारने याबाबत शेजारच्यांना कळविले. सर्वांनी शेताकडे धाव घेतली. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य असावे, शेतातील दृश्य पाहताच सर्वाच्या काळजाचे ठोके वाढले आणि पाहणारे गहिवरून गेले. सर्वांचे मन सुन्न झाले. प्रतीभा ही शेतातील बांधीमध्ये मृतावस्थेत पडून होती. पतीविरहातून स्वत:ला सावरत कर्तव्य, संस्कार, आधार व परिश्रमाच्या जोरावर चंद्रशेखर व तुषार यांची ‘प्रतीभा’ तेजोमय करू पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी प्रतिभाच मुकी झाल्याने चंद्रशेखर व तुषार आई प्रतिभापासून कायमचे दूर झाले. या नाकतोडे कुटुंबाला केवळ एक एकर शेती आहे. चंद्रशेखर इयत्ता नववीत असून तो मामाकडे जुगनाळा येथे शिकत आहे. तुषार हा विसोरा जि.प. शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. शुक्रवारला स्वत:च्या शेतात निंदन करताना प्रतिभाला सर्पदंश झाल्याने ती तिथेच मृतावस्थेत पडली अन् चंद्रशेखर व तुषारला कायमची सोडून गेली. त्यामुळे चंद्रशेखर व तुषार आता पोरके झाले आहेत.निराधार चंद्रशेखर व तुषारला मदतीची गरजमातृ-पितृछत्र हरविल्याने विसोरा येथील चंद्रशेखर व तुषार ही दोन मुले निराधार झाली आहेत. ते शिक्षण घेऊन मोठे होण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे. एखाद्या संस्था वा व्यक्तीने दातृत्व स्वीकारने गरजेचे आहे. शासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे.