चामोर्शी तालुक्याला बसला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:35 AM2021-05-16T04:35:30+5:302021-05-16T04:35:30+5:30

सिंचन सुविधा असलेले शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती. धान पिकाची सध्या कापणी सुरू असताना जोरदार पाऊस आला. ...

Chamorshi taluka was hit by unseasonal rains | चामोर्शी तालुक्याला बसला अवकाळी पावसाचा फटका

चामोर्शी तालुक्याला बसला अवकाळी पावसाचा फटका

Next

सिंचन सुविधा असलेले शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती. धान पिकाची सध्या कापणी सुरू असताना जोरदार पाऊस आला. त्यामुळे धान पीक कापून असलेल्या भात खचरात पाणी साचून धान कडपा पाण्याखाली आल्या आहेत. धान पिकांसह आंबा पीक वादळामुळे शेत शिवारात असलेली झाडे कोलमडून खाली पडलेली दिसून येत आहेत. नवेगाव माल येथे वादळाने झाड अंगणात कोसळले सुदैवाने प्राणहानी टळली तसेच गावागावातील घरावरील कवले उडून मोठे नुकसान झाले. कळमगाव येथील हरिश्चंद्र गेडाम यांच्या नवीन घरावरील लावलेले सिमेंट पत्रे उडून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चामोर्शी येथील विनोद पेशटीवार यांची चहा दुकानाची झोपडी पडल्याने नुकसान झाले. रेगडी येथे विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ही माहिती कळताच रेगडी ग्रामपंचायतीचे सचिव सलामे, आकाश कुळमेथे, प्रशांत शहा, योगेश कुळमेथे यांनी झाड तोडून विद्युत पुरवठा सुरळीत केला. अनखोडा, कढोली, रामपूर परिसरात घराचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

बॉक्स

वीज पडून एक बैल व दोन रेडकू ठार

सगणापूर येथील शेतकरी हिरामण भोयर यांच्या मालकीच्या बैलावर वीज कोसळली यात बैल ठार झाला. या घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सरपंच पार्वता कन्नाके, पोलीस पाटील तन्वी कोडापे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कन्नाके, माजी उपसरपंच कैलास कोडापे, धनराज सेलोटे, नामदेव आभारे, विजय सेलोटे, कोतवाल रेवणनाथ मेश्राम उपस्थित होते. यात बैल मालक हिरामण भोयर यांचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या घटनेत आमगाव महाल येथील विश्वनाथ सखाराम जुवारे यांच्या दोन रेडकूवर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले आहे.

===Photopath===

150521\img-20210515-wa0103.jpg

===Caption===

चामोर्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे घराची नुकसान व गायीचा मृत्यू

Web Title: Chamorshi taluka was hit by unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.