शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चाैकानजीकचा चामाेर्शी मार्ग परिसर झाला माेकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या मार्गालगत कार्यालयाची संरक्षण भिंत नव्याने बांधण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या दाेन्ही मार्गांलगत नाली बांधून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने येथील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. सूचना दिल्यानंतर फूटपाथ दुकानदारांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढले. तर प्रशासनाच्या वतीने या मार्गावरील माेठी झाडे ताेडण्यात आली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : चामाेर्शीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गडचिराेली शहरातून सुरू आहे. दरम्यान, शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बाजूचे काम केमिस्ट भवनाजवळ पाेहाेचले आहे. दाेन्ही बाजूंचे काम नालीसह पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. दरम्यान, इंदिरा गांधी चाैकालगतच्या फूटपाथ दुकानांचे अतिक्रमण काढल्याने हा परिसर माेकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या मार्गालगत कार्यालयाची संरक्षण भिंत नव्याने बांधण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या दाेन्ही मार्गांलगत नाली बांधून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने येथील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. सूचना दिल्यानंतर फूटपाथ दुकानदारांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढले. तर प्रशासनाच्या वतीने या मार्गावरील माेठी झाडे ताेडण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काॅक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार व कंपनीचे ढिसाळ नियाेजन असल्याने या मार्गाच्या कामात प्रचंड लेटलतीफपणा दिसून येत आहे. पावसाळ्यात शहरवासीय व या मार्गाने आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पावसाळ्यात एका बाजूचा रस्ता खाेदून ठेवण्यात आल्याने त्यात पावसाचे पाणी साचले हाेते. दरम्यान, अनेकदा या मार्गावर वाहतूक विस्कळित झाली. या मुद्यावर शहरवासीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. आता प्रशासनाच्या वतीने राेड व नाली बांधकामाला गतीने सुरुवात करण्यात येणार असल्याने गडचिराेलीकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दरम्यान, शनिवारी चामाेर्शी मार्गाच्या दाेन्ही बाजूंकडील माेठी झाडे ताेडून परिसर माेकळा करण्यात आला. आता या दाेन्ही मार्गांवरील सर्वच फूटपाथ दुकाने दिसेनासे झाले आहेत.

आमचा राेजगार हिरावू नका-    प्रशासनाने संरक्षण भिंत, राेड व नालीचे बांधकाम जरूर करावे, मात्र आमचा राेजगार हिरावू नये. नालीवर किंवा रस्त्याच्या कडेला थाेड्याशा जागेत आमचे दुकान राहू द्यावे, अशी भावना या दाेन्ही मार्गांवरील फूटपाथ दुकानदारांनी व्यक्त केली आहे. आमच्या राेजगारावर परिणाम हाेत असेल तर शासन व प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. 

पार्किंग व्यवस्था कुठे?-    गडचिराेली नगरपालिका प्रशासन व रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या प्रशासनाचे याेग्य नियाेजन नसल्याने गडचिराेली शहरातील इंदिरा गांधी चाैक व चारही मुख्य मार्गावर वाहन पार्किंगची व्यवस्था मुळीच नाही. परिणामी, वाहनधारक आपली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे अपघातास आमंत्रण मिळते. याबाबत प्रशासन कमालीचे उदासीन दिसून येते.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण