शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीदिन सात लाख करवसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:16 IST

तब्बल २० वर्षाच्या कालावधीनंतर नगर परिषदेने कर वसुलीची धडक मोहीम सुरू करून थकीत करधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तरीही १४ मार्चपर्यंत मालमत्ता कराची केवळ १ कोटी ५० लाख ४३ हजार रूपये एवढी वसुली झाली आहे.

ठळक मुद्देमालमत्ता कर : गडचिरोली नगर परिषदेची धडक मोहीम

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : तब्बल २० वर्षाच्या कालावधीनंतर नगर परिषदेने कर वसुलीची धडक मोहीम सुरू करून थकीत करधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तरीही १४ मार्चपर्यंत मालमत्ता कराची केवळ १ कोटी ५० लाख ४३ हजार रूपये एवढी वसुली झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्याला केवळ १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नगर परिषदेला १ कोटी ३ लाख ६० हजार रूपयांची वसुली करावी लागणार असून त्यासाठी दर दिवशी सात लाख रूपये कर वसुली होणे गरजेचे आहे.गडचिरोली शहरात एकूण ११ हजार २०० मालमत्ताधारक आहेत. काही मालमत्ताधारक नियमितपणे कराचा भरणा करतात. मात्र काही मालमत्ताधारकांनी मागील सात ते आठ वर्षांपासून मालमत्ता करच भरला नाही. आजपर्यंत नगर परिषद सुध्दा कोणतीही कारवाई करीत नसल्याने मालमत्ता करधारक कराचा भरणा करीत नव्हते. नगर विकास विभागाने कोणत्याही परिस्थितीत ९० टक्केपेक्षा कर वसुली करण्याचे निर्देश नगर परिषदेला दिले आहेत. त्यामुळे नगर परिषदेने मागील एक महिन्यापासून कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. कर वसुलीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मागील दोन दिवसांपासून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. तरीही मालमत्ता कराची वसुली बुधवारपर्यंत केवळ ५९.२१ टक्के एवढीच झाली आहे. मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे २ कोटी ५४ लाख ४ हजार ४७२ एवढी आहे. त्यापैकी बुधवारपर्यंत १ कोटी ५० लाख ४३ हजार ७७३ रूपयांची वसुली झाली आहे. केवळ ५९.२० टक्के वसुली झाली असल्याने उर्वरित ४० टक्के वसुली करण्याचे आव्हान नगर परिषदेसमोर आहे. आर्थिक वर्ष संपण्याला केवळ आता १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. या १५ दिवसात अधिकाधिक वसुली होईल. यासाठी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले असल्याचे दिसून येते.पाणीपट्टी वसुली समाधानकारकगडचिरोली शहरात एकूण ७ हजार ६०० नळधारक आहेत. अर्धा इंच नळधारकावर वार्षिक १ हजार ३५० रूपये तर पाऊण इंच नळधारकारवर २ हजार ४०० रूपये कर आकारला जातो. पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी ६७ लाख ५६ हजार ५०५ रूपये आहे. त्यापैकी १४ मार्चपर्यंत सुमारे १ कोटी ५२ लाख ९० हजार ६८४ रूपयांची पाणीपट्टी वसुली झाली आहे. टक्क्यामध्ये हे प्रमाण ९१.२५ टक्के एवढे असून मालमत्ता कराच्या तुलनेत पाणीपट्टीची वसुली समाधानकारक असल्याचे दिसून येते. पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी नगर परिषदेचे कोट्यवधी रूपये खर्च होतात. त्यामुळे पाणीपट्टी थकीत राहणार नाही, याची दक्षता पाणी पुरवठा विभाग वर्षभर घेत असल्याने पाणीपट्टीची वसुली तुलनेने अधिक आहे. एक वर्षापेक्षा अधिक कालावधीत पाणीपट्टी थकल्यास संबंधित नळधारकाचा नळ कनेक्शन कापले जाते.जप्तीनंतर वसुलीचे प्रमाण वाढलेमागील अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता करधारकांच्या वस्तू जप्त करण्याची मोहीम नगर परिषदेने दोन दिवसांपासून सुरू केली आहे. याचा धसका घेत अनेक नागरिक नगर परिषदेच्या कार्यालयात स्वत: जाऊन कराचा भरणा करीत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कर वसुलीचे प्रमाण वाढले आहे. ३१ मार्चपर्यंत कर वसुली ९० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा न.प. अधिकाऱ्यांना आहे.