शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
4
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
5
मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
6
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
7
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
8
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
9
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
10
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
11
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
12
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
13
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
14
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
15
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
16
देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
17
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
18
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
19
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
20
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
Daily Top 2Weekly Top 5

झंकारगोंदी फाट्यावर चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

प्राणपुर (रिट) या गावाचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला सामूहिक दावा तात्काळ बोदालदंड ग्रामपंचायतला देण्यात यावा, प्राणपूर (रीट) कक्ष क्रमांक ४७३ ला बांबू तोड व विक्रीकरिता वन विभागाकडून मंजुरी देण्यात यावी व या रिटी गावाचे वनविभागामार्फत एकूण कक्ष क्रमांक ५४६, ५४७, ४७३ असे तीन कक्ष क्रमांक आहेत. या तीनही कक्ष क्रमांकाचे अधिकार बोदालदंड ग्रामपंचायतीला देण्यात यावे, रीठी गावाचे क्षेत्र सातबारानुसार १.१० हेक्टर आर. जमीन ग्रामपंचायतीला देण्यात यावी.

ठळक मुद्देबोदालदंडवासीय आक्रमक : डीएफओंच्या लेखी आश्वासनाने आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : अनेकदा शासनाकडे निवेदन देवून सुद्धा समस्या सुटली नाही तसेच वनविभागाच्या निष्क्रीयपणाला कंटाळून ग्रामपंचायत बोदालदंड अंतर्गत येत असलेल्या बोदालदंड, बेलारगोंदी व बिजेपार या तीन गावातील नागरिकांनी सोमवारी झंकारगोंदी फाट्याजवळ विविध मागण्यांना घेऊन चक्काजाम आंदोलन केले. तहसीलदारांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलन सुरू झाल्याच्या काही वेळानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी आताच मोजमाप सुरू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.प्राणपुर (रिट) या गावाचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला सामूहिक दावा तात्काळ बोदालदंड ग्रामपंचायतला देण्यात यावा, प्राणपूर (रीट) कक्ष क्रमांक ४७३ ला बांबू तोड व विक्रीकरिता वन विभागाकडून मंजुरी देण्यात यावी व या रिटी गावाचे वनविभागामार्फत एकूण कक्ष क्रमांक ५४६, ५४७, ४७३ असे तीन कक्ष क्रमांक आहेत. या तीनही कक्ष क्रमांकाचे अधिकार बोदालदंड ग्रामपंचायतीला देण्यात यावे, रीठी गावाचे क्षेत्र सातबारानुसार १.१० हेक्टर आर. जमीन ग्रामपंचायतीला देण्यात यावी. वन विभागामार्फत झालेल्या कामाची योग्य चौकशी करून काम करून घेणाऱ्या वनरक्षकाला तत्काळ कारवाई करून निलंबित करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. परंतु फक्त आश्वासनावर आंदोलन मागे घेणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले नंतर उपवनसंरक्षक कुमारस्वामी यांच्या आदेशाने बेळगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले यांनी २० ऑक्टोंबरपासून मोजणीला सुरुवात करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीनही गावातील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम