शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

झंकारगोंदीजवळ शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रतिएकर ९.५० क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रतिएकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे.  गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा धानखरेदीची मर्यादा १७ क्विंटल करण्यात यावी.  तालुक्यातील बेतकाठी आणि बेळगाव या दोन केंद्रांवर रब्बी हंगामातील धान खरेदी केले जाणार असून या केंद्रांची खरेदी मर्यादा ३०३६  क्विंटल आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या कोरची येथील झंकारगोंदीजवळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. १) बेमुदत चक्काजामआंदोलन केले. या आंदोलनाला उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार सी. आर. भंडारी व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असल्याने रस्त्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी कृषी विभागाचे अधिकारी लाकेश कटरे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता मिथिन मुरकुटे, सहायक अभियंता प्रफुल कुरसंगे यांनीही भेट देऊन चर्चा केली. पण शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनस्थळी येऊन चार दिवसांत संपूर्ण मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकरी परिषदेचे हे बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले.कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रतिएकर ९.५० क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रतिएकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे. गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा धानखरेदीची मर्यादा १७ क्विंटल करण्यात यावी.  तालुक्यातील बेतकाठी आणि बेळगाव या दोन केंद्रांवर रब्बी हंगामातील धान खरेदी केले जाणार असून या केंद्रांची खरेदी मर्यादा ३०३६  क्विंटल आहे. ही मर्यादा वाढवून ८ हजार क्विंटल प्रतिकेंद्र करण्यात यावी. खरीप हंगामातील धान खरेदीचे बोनस तत्काळ जमा करावे, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  बेडगाव पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक नितीश पोटे, अनिल नानिकर यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाचे नेतृत्व नंदकिशोर वैरागडे, सुरेश काटेंगे, रामसुराम काटेंगे, अशोक गावतुरे, केशव लेनगुरे, आसाराम शेंडे, सियाराम हलामी, रंजित बागडेहरीया, भावराव मानकर, मेहरसिंग काटेंगे, सुनील सयाम, रुपेश गंगबोईर, रूपराम देवांगन, धनिराम हीळामी, सुखराम राऊत, महादेव बन्सोड, रामाधिन ताराम, तुलसीदास मडावी, शंकर जनबंधू यांनी केले.

अशा होत्या मागण्या-    रब्बी हंगामात एकूण १७ क्विंटल धान खरेदी केंद्र करावे, बेतकाठी व बेळगाव या दोन गावांसाठी आठ हजार क्विंटलची धान खरेदीची परवानगी द्यावी, खरीप हंगामातील धानाचे बोनस तत्काळ देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे जोडणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरला त्यांची जोडणी तत्काळ करण्यात यावी, अशा विविध मुद्द्यांसह हे आंदोलन करण्यात आले.

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामagitationआंदोलन