लाेकमत न्यूज नेटवर्करांगी : आदिवासाी विकास महामंडळाअंतर्गत धानाेरा तालुक्यात सात आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी मिळाली मात्र धानाेरा तालुक्यात एकही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे छत्तीसगड, मुरूमगाव येथून ट्रॅक, ट्रॅक्टर, मिनीडाेअरच्या सहाय्याने आतापासूनच धान केंद्रावर धानाची विक्री केली जात आहे. त्यासाठी सातबारा येथे कुठून हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर केंद्रावर हाेणारी धानाची विक्री थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धानाेरा उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धानाची खरेदी केली जाते. धानाेरा तालुक्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी हलक्या, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. कापणी, बांधणी हाेऊन काही शेतकरी धानाची मळणी केली जात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना धानाची विक्री करण्यासाठी आधारभूत केंद्र सुरू हाेणे गरजेचे आहे. मात्र केंद्र सुरू न झाल्याने प्रसंगी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कवडीमाेल भावात धानाची विक्री करतात. शासनाने धान खरेदी केंद्रांना परवानगी दिली. डिसेंबर महिना उजाडला असूनही धानाेरा तालुक्यात एकही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. मात्र खरेदी सुरू झाल्याचा देखावा करीत शेतकऱ्यांना सातबारा व इतर कागदपत्रे घेऊन आविका संस्थेच्या वतीने ऑनलाईन कामासाठी बाेलाविले जात आहे. शेतकऱ्यांना टाेकन क्रमांक देऊन कागदपत्रे घेतली जात आहेत. याचा अर्थ प्रक्रिया ऑनलाईन झाली काय, तसेच तारखेनुसारच खरेदी हाेणार काय, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
अशी आहे धानविक्रीची मर्यादामहामंडळाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाने मर्यादा ठरवून दिली आहे. यावर्षी धानाचे उत्पादन कमी झाल्याने एकरी ९ क्विंटल व हेक्टरी २४ क्विंटल धानाची विक्री शेतकऱ्यांना करता येणार आहे.
केंद्रावर साहित्य पाेहाेचलेधानाेरा तालुक्यातील रांगी, धानाेरा, माेहली, साेडे, दुधमाळा, चातगाव व कारवाफा आदी ठिकाणच्या धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून या केंद्रांवर शासनाच्या वतीने वजनकाटा, सातबारा व सुतळी आदी साहित्य पाेहाेचविण्यात आले आहेत. त्यामुळे या केंद्रावर प्रत्यक्ष धानाची खरेदी सुरू करण्यास काही अडचण नाही.