शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश तस्करीचा गोरखधंदा ; खेडेगावातून गोवंश चोरी करून केली जाते तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:11 IST

Gadchiroli : खेडेगावातून गोवंश गोळा केल्यानंतर त्यांना जंगलातच बांधले जाते. त्यानंतर वाहनात कोंबून होते तस्करी

लिकेश अंबादे लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : जिल्ह्याच्या उत्तर भागात छत्तीसगड राज्यातून हजारो गोवंशाची तस्करी रात्रीच्या सुमारास गडचिरोली- नागपूर व्हाया तेलंगणा राज्यात केली जाते. तालुक्यातून दर आठवड्यातून २० ते २५ ट्रक गोवंश भरून नागपूर, हैदराबाद येथे पाठविले जातात. एवढे नाके व पोलिस चौकी ओलांडून वाहने जातातच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तालुक्याच्या कोटरा परिसरातील खिरुटोला जंगलात चारा-पाणी न देता निर्दयतेने बांधून ठेवलेल्या ११६ गोवंशाची सुटका कोरचीचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी केली होती. या कारवाईनंतर सुद्धा नागपूरचे तस्कर पोलिसांना न जुमानता गोवंशाची तस्करी बिनधास्त करीत आहेत. कोरची, कोटगूल, ग्यारापत्ती, बेडगाव, पुराडा, कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, आष्टी आदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तेलंगणा, हैदराबाद, नागपूरला गोवंशाची तस्करी केली जाते. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.

३० वर्षांपासून तस्करी फोफावली कोरची तालुका हा नागपूरच्या गोवंश तस्करांचे माहेरघर बनलेला आहे. यामुळे नागपूरचे मोठे तस्कर कोरचीतील पाच ते सहा खेड्यांलगत असलेल्या जंगलात ठिय्या मांडून त्या ठिकाणी गोवंश साठवून तस्करी करतात. मागील ३० वर्षांपासून रात्री तस्करी केली जात आहे.

तस्कर पुढे ट्रक मागे गोवंशाची कत्तलखान्यात वाहतूक करण्यापूर्वी अनेक पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून तस्कर स्वतः आपल्या चारचाकी वाहनाने रस्त्यात पुढे असतात. रस्त्यात पोलिस नाकेबंदीत आढळले तर मार्ग बदलतात.

'ही' गावे आहेत तस्करीचे केंद्र छत्तीसगड राज्यातील अनेक गावांतून नागपूरचे तस्कर काही गोवंश खरेदी करतात. काही गोवंशाची चोरीने खरेदी करून जंगल मार्गाने मजुरांमार्फत पायदळ सीमा ओलांडून कोरची तालुक्यातील बोटेकसा, कोटरा, हितापाडी, बोरी, कोसमी नं. २ या गावांच्या जंगल परिसरातून ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्यात नेतात.

"मी स्वतः आतापर्यंत सहा ट्रके पकडून गोवंशाची सुटका करून तस्करांवर कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी खिरुटोला ११६ गोवंशाची तर बेडगाव येथेही ट्रकांना अडवून कारवाई केली. हा परिसर नक्षलप्रभावित असल्याने नियमांचे पालन करून कारवाया कराव्या लागतात. लवकरच कडक कारवाई केली जाईल."- रवींद्र भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी, कुरखेडा

टॅग्स :Smugglingतस्करीGadchiroliगडचिरोली