जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या आदेशानुसार तिसऱ्या लाटेला राेखण्यासाठी पूर्वतयारी करीत असताना वेळीच तपासणी करून रोगनिदान झाल्यास जनसामान्यांना परत प्रादुर्भाव होत आहे किंवा नाही हे ओळखता येईल. याकरिता सर्व शासकीय, निमशासकीय व बिगर शासकीय कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी करणे आवश्यक आहे. तहसीलदार पित्तुलवार हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीकरिता तालुक्यात नियोजन करीत आहेत. सोमवारी (दि. ५) गडचिरोली येथून आलेल्या आरोग्य पथकाद्वारे महसूल अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल अशा एकूण ७५ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार दामोदर भगत, माधुरी हनुमते, पुरवठा निरीक्षक चंदू प्रधान, मंडळ अधिकारी राजू मुप्पीद्वार, दशरथ भांडेकर व सर्व तलाठी कोतवाल उपस्थित होते.
धानोरा येथे महसूल कर्मचाऱ्यांची काेराेना अँटिजन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST