शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सी-६० कमांडोने नेपाळमध्ये फडकाविला महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 20:02 IST

नक्षलविरोधी अभियान राबविताना अनेक संकटांचा सामना करणा-या गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोंच्या अनेक वीरगाथा नेहमीच ऐकायला आणि वाचायला मिळतात.

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविताना अनेक संकटांचा सामना करणा-या गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोंच्या अनेक वीरगाथा नेहमीच ऐकायला आणि वाचायला मिळतात. पण त्यातील बाईक रायडर असलेले नायक पोलीस शिपाई किशोर खोब्रागडे यांनी आता ३५०० किलोमीटरचा खडतर प्रवास आपल्या बाईकने अवघ्या १२ दिवसांत पूर्ण करून नवीन विक्रम घडविला आहे. एवढेच नाही तर नेपाळमध्ये महाराष्ट्र आणि गडचिरोली पोलिसांचा ध्वज फडकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.सन २००७पासून गडचिरोली पोलीस दलात असलेल्या खोब्रागडे यांनी २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये १३ दिवसांत २४०० किलोमीटरचा खडतर प्रवास बाईकने पूर्ण केला होता. अतिशय थंड हवामानाच्या प्रदेशातील खारडोंगला मार्ग (१८,३८० फूट), तागलंगला मार्ग (१७,५८२ फूट), चांगला रस्ता (१७,५६६ फूट) ही ठिकाणं अवघ्या १३ दिवसात पूर्ण केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये भूतानमधील उंच शिखरावर बाईकने गेले होते. यावर्षी ते २५ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीवरून नेपाळसाठी रवाना झाल्यानंतर काठमांडू, कमलमाई, जनकपूर असा प्रवास पूर्ण करत त्यांनी पोखरा (नेपाळ) येथे पॅराग्लायडिंग केले. यावेळी तेथील आकाशात महाराष्ट्र पोलीस दल आणि सी-६० कमांडोजचा ध्वज अभिमानाने फडकविला. युवकांसाठी प्रेरणादायी ठरणा-या किशोर खोब्रागडे यांच्या जिद्द व चिकाटीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले.‘नो ड्रग, नो वॉर’किशोर खोब्रागडे यांनी आपल्या या बाईक रायडिंगची थिम ‘नो ड्रग, नो वॉर’ (अंमली पदार्थ नको आणि युद्ध नको) अशी ठेवली होती. नेपाळपर्यंतच्या प्रवासादरम्यान काही शाळांमध्ये जाऊन त्यांनी याचा प्रचारही केल्याचे खोब्रागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच पॅराग्लायडिंग गडचिरोलीतील शहीद जवानांना समर्पित केल्याचे ते म्हणाले.