शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची शिक्षकपदी नियुक्ती करून बेरोजगारांच्या आशेवर फेरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 14:51 IST

पात्रताधारकांमध्ये रोष : सुशिक्षितांना संधी देण्याची मागणी

प्रदीप बोडणेलोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या पदासाठी पात्र उमेदवार आहेत. असे असतानाही पेसा क्षेत्रात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सुशिक्षित बेरोजगारांऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना डावलून सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती का केली जात आहे, असा सवाल सुशिक्षित बेरोजगारांचा आहे.

जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षण भरतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सरकारला पात्र उमेदवारांची शिक्षक भरती करता येत नाही. यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०२४ रोजी आदेश काढून त्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे सेवानिवृत्त शिक्षकांमधून करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

पेसा क्षेत्रातील सर्व पंचायत समितीअंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्तीपत्रही पाठविलेले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांना आधीच ३० ते ४० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. सर्व शिक्षकांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे. त्यांच्याकडून आता अध्यापनाचे कार्य उत्तम प्रकारे होईल काय, असा सवाल सुशिक्षित बेरोजगारांचा आहे. सुशिक्षितांकडून अर्ज मागविले जात असले तरी नियुक्ती केव्हा होणार, असा प्रश्नही आहे.

सुशिक्षित बेरोजगार म्हणतात...."पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांची भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने तात्पुरत्या स्वरुपात सेवानिवृत्ती शिक्षकांची नियुक्ती म्हणजे पोट भरलेल्या लोकांना पुन्हा अन्न वाढण्यासारखे आहे. याच कारणामुळे बेरोजगारीची संख्या वाढत आहे."- पुनीत बावनकर, वैरागड

"जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड असताना बेरोजगार तरुणांना रोजगार न देता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करणे म्हणजे बेरोजगारांवर अन्याय आहे. अटी शिथिल करून सुशिक्षितांना संधी द्यावी." - ज्योत्स्ना बोडणे, वैरागड

"सेवानिवृत्त शिक्षकांना आधीच निवृत्तीवेतन मिळत असताना पुन्हा मानधन करणे चुकीचे देऊन नियुक्त्ती आहे. सेवानिवृत्त शिक्षक सेवाभाव ठेवून विद्यादानाचे काम मोफत करत असतील तर आमची काही अडचण नाही."- अंकित बोधनकर, वैरागड

"सेवानिवृत्त शिक्षकांना तालुक्यापासून २० ते ३० किलोमीटर अंतरावरील गावांत नियुक्त केले तर ये-जा करू शकत नाही. सेवानिवृत्त काही शिक्षकांना आजार असतात. त्यामुळे ते कुटुंबापासून दूर राहू शकत नाहीत."- चंदू उंदीरवाडे, वैरागड 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGadchiroliगडचिरोली