शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बस-ट्रॅक्टरची टक्कर, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:14 IST

चामोर्शी येथील मार्कंडेश्वराच्या यात्रेवरून परतणारा भाविकांचा ट्रॅक्टर आणि एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात घोट ते रेगडी मार्गावर माडेआमगाव क्रॉसिंग समोरील वळणावर घडला.

ठळक मुद्देबसच्या धडकेत एक गायही ठार : माडेआमगाव नजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी येथील मार्कंडेश्वराच्या यात्रेवरून परतणारा भाविकांचा ट्रॅक्टर आणि एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात घोट ते रेगडी मार्गावर माडेआमगाव क्रॉसिंग समोरील वळणावर घडला. याच बसने रेगडीपासून एक किमी अंतरावर एका गायीला धडक दिल्याने ती गाय ठार झाली. सदर घटना बुधवारला रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात अरुण मट्टामी (१५) व सुनील कुलेटी (१६) दोन्ही रा. देवदा हे गंभीर जखमी झाले. याशिवाय ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.गडचिरोली आगाराची एम.एच.०७, सी ९३२० क्रमांकाची गडचिरोली- विकासपल्ली ही बस विकासपल्लीवरून घोटकडे परत येत होती तर विरुद्ध दिशेने मार्कंडाच्या यात्रेवरून परत देवदाकडे यात्रेकरू ट्रॅक्टरने जात होते. ट्रॅक्टर क्र. एमएच ३३ एफ ४७३२ व ट्रॉली क्रमांक एमएच ३३ जी ४०५७ या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसने धडक दिली. ट्रॉलीमध्ये १२ ते १५ जण बसले होते तर बसमध्ये सुद्धा तीन प्रवासी होते. यात ट्रॅक्टर मधील अरुण मट्टामी व सुनील कुलेटी हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आले.बसचालक हा दारूच्या नशेत गाडी चालवित असल्याची चर्चा अपघातस्थळी होती. हा अपघात होण्याअगोदर रेगडीपासुन १ किमी अंतरावर स्मशानभूमीजवळ या बसने एका गायीला धडक देऊन ठार केले. तसेच ट्रॅक्टरला धडक देऊन बस ३०० मीटर दूर जंगलात गेली. यात बसचे ब्रेक फेल झाल्याचे समजते. सदर घटनेची तक्रार रेगडी पोलीस मदत केंद्रात दाखल केली असून पुढील तपास रेगडी पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक धनजी खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयराम तिम्मा करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात