लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : सिरोंचा-चंद्रपूर मार्गावरील आलापल्लीजवळील भंबारा चौकात ट्रकने एसटीला धडक दिली. या धडकेत एसटी क्षतिग्रस्त झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर अपघात सोमवारी सकाळी ६.३० वाजता झाला.सीजी ०८, एल १२६२ या क्रमांकाचा ट्रक सिरोंचावरून तांदूळ घेऊन चामोर्शीकडे जात होता. त्याचवेळी अहेरीवरून एटापल्लीकडे जाणाऱ्या एमएच ४० एक्यू ६०९४ या क्रमांकाच्या बसला धडक दिली. बसमध्ये चार प्रवाशी बसले होते. ट्रकची धडक बसण्याची शक्यता लक्षात घेऊन बसचालक विनोद सरनाईक यांनी बस बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. प्रवाशी समोर बसले होते. ट्रकची धडक मागण्या बाजुला बसली. त्यामुळे कोणताही प्रवाशी जखमी झाला नाही. बसचा टायरजवळचा बराच भाग क्षतिग्रस्त झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक बाळासाहेब शिंदे, अहेरी एसटी आगाराचे व्यवस्थापक युवराज राठोड व आगार प्रमुख जितेंद्र राजवैद्य यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ट्रकची बसला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:48 IST
सिरोंचा-चंद्रपूर मार्गावरील आलापल्लीजवळील भंबारा चौकात ट्रकने एसटीला धडक दिली. या धडकेत एसटी क्षतिग्रस्त झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर अपघात सोमवारी सकाळी ६.३० वाजता झाला.
ट्रकची बसला धडक
ठळक मुद्देजीवितहानी टळली : आलापल्लीजवळ अपघात, एसटीचे नुकसान