शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्राण्यांजवळ फटाके फोडाल तर होईल तुरुंगवास; प्राण्यांची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:06 IST

Gadchiroli : पक्ष्यांनाही त्रास वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : दिवाळीमध्ये फटाके मोठ्या प्रमाणात फटाके उडविली जातात. अनेकजण उत्साहात कुत्री, गायी व म्हशींच्या शेपटीला फटाके लावून उडवतात. प्राणी घाबरला की हसतात. पण असे करणे वन्यजीव संरक्षण कायदा (१९७२) अंतर्गत गुन्हा असून, तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

अनेकवेळा फटाके फोडताना लोकांना इजा होणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र, आजूबाजूला असलेल्या प्राण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. मोठ्या आवाजाचे फटाके, यासोबतच प्रचंड धूर करणाऱ्या फटाक्यांमुळे ज्याप्रमाणे माणसावर विपरित परिणाम होतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या प्राण्यांवरही विपरित परिणाम होतात. अनेकवेळा जाणूनबुजून काही समाजकंटक मुक्या प्राण्यांना इजा होईल, अशा पद्धतीने फटाके फोडतात. त्यामुळे प्राण्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. 

प्राणी सैरावैरा पळाल्यास काय कराल? फटाक्यांच्या आवाजाने घाबरून अनेकवेळा कुत्रा आणि मांजर रस्त्यावर सैरावैरा धावू लागतात. त्यात त्यांचा अपघात होऊ शकतो. प्राणी संग्रहालय परिसराच्या बाजूला फटाके वाजवू नयेत. मोठ्या आवाजाचे फटाके सहसा फोडू नयेत. फटाके फोडताना कुत्रे किंवा मांजर झोपलेले असल्याने त्यांना उठवावे.

प्राणीही घाबरतातफटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे घाबरून कुत्र्यांचे अंग थरथरणे, लाळ गळणे, शांत ठिकाणी लपून बसणे, मोठ्याने ओरडणे, उपाशी राहणे यासारखे प्रकार कुत्र्यांमध्ये दिवाळी सणादरम्यान दिसून येतात. तसेच आवाजामुळे अनेकदा पाळीव कुत्री घर सोडून पळून जातात.

"पेटवलेले फटाके कुत्रा, मांजर किंवा इतर प्राण्यांच्या अंगावर टाकले जातात. यामुळे प्राणी गंभीर जखमी होतात. आनंदात दिवाळी साजरी करत असताना त्या प्राण्यांचा विचार करावा. फटाके फोडताना आजूबाजूला कोणी प्राणी आहेत का? हे पाहावे. शक्यतो प्राण्यांजवळ फटाके फोडणे टाळावे." - अजय कुकडकर, प्राणीमित्र, गडचिरोली

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDiwaliदिवाळी 2024Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारfire crackerफटाके