शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा खंडित होताच् बीएसएनएलची सेवा पडते ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:56 IST

ग्राहक कमालीचे त्रस्त : फोन लागत नाही, आवाजही येत नाही

लिकेश अंबादे लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची शहरांमध्ये बीएसएनएलचे दोन टॉवर आहेत. त्यापैकी तहसील कार्यालय परिसरमधील बीएसएनएल टॉवरची सेवा नेहमीच कुचकामी ठरत आहे. या परिसरात शासकीय व प्रशासकीय कार्यालय असून ग्राहकांना बीएसएनएल सेवा वेळेवर मिळत नसल्याने अडथळा निर्माण होत आहे. तालुक्यातील विद्युत सेवा ठप्प झाली की बीएसएनएल सेवासुद्धा ठप्प पडत आहे. फोन लागत नाही लागला तर आवाज येत नाही अशा अडचणी निर्माण होत आहेत.

कोरची तालुक्यात अनेक ठिकाणी बीएसएनएलच्या थ्री-जीचे टॉवर उभारले आहेत; परंतु कोरची तहसील, मसेली, कोटगुल, बेतकाठी या गावातील विद्युत खंडित होताच ग्राहकांच्या मोबाईलमध्ये इंटरनेटही चालत नाही. महागडे रिचार्ज करूनही बीएसएनएल सेवा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. काही ग्राहक बीएसएनएल सेवा बंद करून इतर कंपन्यांची सेवा सुरू करत आहेत.

कोरची शहरातील तहसील ऑफिस परिसरात असलेल्या बीएसएनएल टॉवरवर निर्भर अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत. त्यामध्ये पोलिस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, गटसाधन केंद्र, नगरपंचायत कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, आयटीआय, शासकीय आश्रमशाळा, वनश्री महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तालुका कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालये आहेत. या कार्यालयात काम करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बीएसएनएल टॉवरची सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

इतर कंपन्यांकडे वळताहेत ग्राहकबीएसएनएल ही भारत सरकारची कंपनी आहे. अगदी सुरुवातीला याच कंपनीचे टॉवर कोरची तालुक्यात असल्याने नागरिकांनी बीएसएनएलचे सीम खरेदी केले. आता मात्र खासगी कंपन्यांनी तालुक्यासह ग्रामीण भागात टॉवर उभारले आहेत. खासगी कंपन्यांची सेवा सुरू होताच नागरिक या कंपन्यांचे सीम खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे.

कोरची शहरात सेवेचा दर्जा अतिशय सुमारतालुक्यातील बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. या गावांमध्ये मोबाइल कव्हरेजच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केल्यास बीएसएनएलकडून जंगलाचे कारण दिले जाते. मात्र कोरची या तालुकास्थळीसुद्धा सेवा अतिशय खराब आहे. इंटरनेटची गती अतिशय कमी असल्याने बीएसएनएलप्रति ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

"वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे बॅटऱ्यांमध्ये बिघाड निर्माण होत आहे. त्यामुळे बीएसएनएल नेटवर्कची समस्या होते. नवीन बॅटऱ्यांचा प्रस्ताव पाठवला आहे. नवीन बॅटऱ्या लागल्यानंतर ही समस्या लवकरच सुटेल." - रवी आंबिलकर, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी, बीएसएनएल

टॅग्स :BSNLबीएसएनएलGadchiroliगडचिरोली