शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला विष देऊन मारल्याच्या संशयातून मेहुण्यांनी धारदार शस्त्रांनी केली भावोजीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 13:28 IST

दोन मेहुण्यांनी भावोजीची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सिरोंचा (गडचिरोली) - दोन मेहुण्यांनी मिळून भावोजीला धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोलीतल सिरोंचा येथील ही घटना आहे. बहीण-भावोजीमध्ये भांडण झाल्यानंतर बहिणीने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. मात्र तिला पतीनंच मारल्याच्या संशयातून दोन मेहुण्यांनी त्याला मारहाण करत व चाकूने भोसकलं. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व घटना रुग्णालय परिसरातच घडली.  मंगळवारी (13 मार्च) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास सिरोंचा येथे ही घटना घडली. 

राजण्णा नामला (वय 32 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 8 वर्षांपूर्वी त्याचे संध्याराणी (वय 25 वर्ष)सोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुले होती. पण दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारासही त्यांच्यात भांडण झालं, मात्र यावेळी संध्याराणीनं घरातील कीटकनाशक पिऊन स्वतःचे आयुष्य संपवले. 

यानंतर तिला सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी तिचे शवपरिक्षण सुरू असताना संध्याराणीचे दोन भाऊ आणि माहेरच्या काही लोकांची राजण्णासोबत रुग्णालयाच्या गेटवरच बाचाबाची झाली. यावेळी राग अनावर झालेल्या माहेरच्या लोकांनी राजण्णाला जबर मारहाण केली तर संतोष (30) व रमेश लखमय्या सोदारी (28) या भावंडांनी त्याला चाकूने भोसकले. 

यात राजण्णाचा जागीच मृत्यू झाला. बहिणीच्या मृत्यूला राजण्णाच कारणीभूत असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली देत दोन्ही भावांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे राजण्णा व संध्याराणी यांच्या दोन्ही मुलांवरील आईवडिलांचे छत्र हिरावले गेले आहे. 

टॅग्स :Murderखून