शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक टॉवर कोसळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:26 PM

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा या तालुका मुख्यालयी ब्रिटिशकालीन राजवटीत बांधण्यात आलेल्या पर्जन्यमापक टॉवरची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : सिरोंचातील ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी

आनंद मांडवे ।आॅनलाईन लोकमतसिरोंचा (गडचिरोली) : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा या तालुका मुख्यालयी ब्रिटिशकालीन राजवटीत बांधण्यात आलेल्या पर्जन्यमापक टॉवरची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडी बांधकाम असलेल्या या ऐतिहासिक वास्तूची निगा राखण्यात शासन व प्रशासनाला आत्मियता नसल्याने त्याची पडझड होत आहे. पुरातत्व विभागामार्फत या वास्तूचे नविनीकरण करून या ऐतिहासिक मूल्यांचे जतन करावे, अशी मागणी होत आहे.हवामान खात्याचे कार्यालय उपराधानी नागपूर येथे असले तरी या खात्याचा कर्मचारी सिरोंचा येथे कार्यरत नाही. इंग्रजांच्या सत्ताकाळात या विभागातील हवामानाचा अंदाज व पर्जन्याचे मोजमाप करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती. स्वातंत्र्यानंरही बरीच वर्षे हे कार्य सुरू होते. १९८० पर्यंत स्थानिक महसूल विभागाकडून पर्जन्याची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येत असे. या कामासाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात असायचा. मात्र काही दिवसानंतर या ठिकाणी कर्मचारी ठेवणे बंद झाले. नागपूरस्थित हवामान खात्याच्या कार्यालयालाही अशी वास्तू महाराष्टÑाच्या अंतिम टोकावरील सिरोंचा येथे अद्यापही गतवैभव टिकवून असल्याचे विस्मरण झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष घातल्यास गतवैभव पुन्हा लाभू शकते. यासाठी राज्य शासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्षतहसील कार्यालयामागे ध्वजस्तंभाजवळ ही टॉवरवजा वास्तू असून तिच्या लाकडी पायऱ्या जीर्ण झाल्या आहेत. एकमेव सागवानी दाराची मोडतोड झाली आहे. टॉवरच्या शिर्ष भागावर अमलतासचे झाड उगवले आहे. दर दिवसागणिक त्याचा आकार व घेर वाढत आहे. या झाडामुळे टॉवरला धोका निर्माण झाला आहे.सध्या ही वास्तू पूर्व दिशेकडे झुकली आहे. आठवडी बाजार, तहसील कार्यालयाचे कर्मचारी व नागरिकांची रहदारी येथूनच राहते. वास्तू कोसळून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटने हे पुष्कर यात्रेचा आढावा घेण्यासाठी सिरोंचा येथे आले असता सदर पर्जन्यमापक इमारतीची दुरवस्था लक्षात घेवून दुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतर या इमारकडे प्रशासनाचे कायमचे दुर्लक्ष झाले आहे.१०७ वर्षानंतही विश्रामगृहे सुस्थितीतगडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याला निसर्गसौंदर्याची देणे आहे. त्यामुळे १९१० मध्ये ११ हजार ३६८ रूपये खर्चुन सिरोंचा येथे ब्रिटिश सरकारने विश्रामगृह बांधले. १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असल्याने सदर इमारती निर्लेखित करण्याविषयी भारत सरकारकडून पत्र येतात. मात्र ब्रिटिशांनी केलेल्या कामाचा दर्जा गुणवत्तापूर्ण व सुसंगत असल्याने या इमारती अजूनही अभेद्य आहेत. सिरोंचा तालुक्यातील बामणी, सोमनपल्ली व कोपेला या आदिवासी व दुर्गम भागातही ब्रिटिशकालीन विश्रामगृहे आहेत. बामनीच्या विश्रामगृहात उपपोलीस स्टेशन थाटले आहे. सोमनपल्लीच्या विश्रामगृहाची दुरावस्था झाली आहे, तर कोपेला येथील विश्रामगृहाची समाजकंटकांनी २३ मार्च २००९ रोजी जाळपोळ केली. या इमारतींचे जतन होण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ऐतिहासिक वास्तूंकडे सरकारचा कानाडोळा होत आहे.