शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

बीआरएसपीचे मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:33 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तत्काळ सुरू करण्यात यावी. प्रत्येक तालुक्याच्या रूग्णालयात एक्स-रे मशीन सुरू करावी, आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी...

ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन : असुविधांबाबत कार्यकर्ते आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तत्काळ सुरू करण्यात यावी. प्रत्येक तालुक्याच्या रूग्णालयात एक्स-रे मशीन सुरू करावी, आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोलीच्या वतीने बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश सचिव डॉ. कैलाश नगराळे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर गुरूवारी मुंडण आंदोलन केले.गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात शासकीय आरोग्य सुविधा तोकड्या आहेत. यामुळे जिल्हाभरातून तसेच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातून मोठ्या संख्येने रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात औषधोपचारासाठी भरती होतात. मात्र येथील सिटी स्कॅन मशीन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने सर्वसामान्य रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चंद्रपूर व नागपूर येथील शासकीय रूग्णालय गाठावे लागत आहे. गरीब रूग्णांना सिटी स्कॅन सेवेसाठी प्रवास खर्चाचा भूर्दंड भरून द्यावा लागत आहे. ओपीडीच्या वेळेस जिल्हा रूग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी रूग्णालयात उपस्थित नसतात. त्यामुळे त्यांची उपस्थिती ओपीडीच्या वेळेस अनिवार्य करण्यात यावी, तसेच कंत्राटी भरती पध्दत बंद करावी, इंदिरा गांधी चौकातील स्वतंत्र महिला रूग्णालयास सावित्रीबाई फुले महिला रूग्णालय असे नाव देण्यात यावे, जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांचे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, शासकीय रूग्णालयात मृत्यू झालेल्या रूग्णास रूग्णवाहिकेद्वारे मोफत घरी पोहोचविण्याची सुविधा करण्यात यावी आदी मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने मुंडण आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष पुरूषोत्तम रामटेके, जिल्हा सचिव सदस्य निमगडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नागदेवते, मीडिया प्रभारी प्रतिक डांगे, तालुकाध्यक्ष विवेक बारसिंगे, शहर अध्यक्ष मिलिंद बांबोळे, मोहन मोटघरे, सचिन गेडाम, देवा बनकर, घनश्याम खोब्रागडे, दीपक बोलीवार, संघरक्षक बांबोळे, गोकुल ढवळे, तुषार भडके, सुरज खोब्रागडे, जितेंद्र बांबोळे, रितेश अंबादे, प्रफुल्ल रायपुरे, विजय देवतळे, धनंजय बांबोळे, बबलू बांबोळे, पियूष वाकडे, विवेक निमगडे, मुकेश सहारे, जयंत पिल्लावन, जयपाल चहांदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मुंडण केल्यानंतर बीआरपीएसपीच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सकांना मागण्यांचे निवेदन सादर केले.दोन महिन्यात सिटीस्कॅन मशीन मिळणारजिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटीस्कॅन मशीन लवकर सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना गुरूवारी दिले. त्यानंतर पदाधिकाºयांनी काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना भ्रमणध्वनीवरून ही समस्या सांगितली. आमदार वडेट्टीवार यांनी लागलीच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ना. सावंत यांनी दोन महिन्यांच्या आत गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात सिटीस्कॅन मशीन पाठवू अशी ग्वाही दिली. त्यामुळे आता लवकरच सिटीस्कॅन मशीन मिळणार आहे. निवेदन देताना जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, युकाँचे लोकसभा क्षेत्र सचिव कुणाल पेंदोरकर, उपसरपंच कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे नंदू सोमनकर आदी उपस्थित होते.आरोग्य प्रशासन हादरलेजिल्हा सामान्य रूग्णालयातील विविध समस्या व असुविधांच्या तसेच सिटीस्कॅनच्या मुद्यावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी रूग्णालय परिसरात आंदोलन करून निवेदन दिले. रूग्णालय परिसरात प्रथमच मुंडण आंदोलन झाल्याने रूग्णालय प्रशासन काही वेळासाठी हादरले होते.