शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

ब्रेथ एनालायझरचा मद्यपींवर वॉच

By admin | Updated: December 21, 2014 23:00 IST

जुन्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता लक्षात

गडचिरोली : जुन्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली वाहतूक शाखेने ब्रेथ एनालायझर मशीन सुसज्य ठेवली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे अवैध पध्दतीनेच दारू खरेदी करावी लागते. यामध्ये मद्यपींना आगावूची किंमत मोजावी लागते. त्यामुळे काही युवक वैनगंगा नदीपल्याड असलेल्या बारमध्ये जाऊन आनंद घेणे पसंत करतात. पार्टीचा आनंद उपभोगल्यानंतर वाहनाने प्रवास केला जातो. दारू पिऊन वाहन चालविने गुन्हा आहे. वाहन चालवितेवेळी ५ मिलीगॅ्रमपेक्षा अधिक अल्कोहोल आढळून आल्यास संबंधीत व्यक्तीवर कारवाई केली जाते. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने वाहतूक शाखा व गडचिरोली पोलीससुध्दा जागरूक झाली आहे. या दिवशी शहरासह मुख्य मार्गांवर पोलीस पाळत ठेवणार आहेत. वाहतूक शाखेकडे ब्रेथ एनालायझर मशिन असून सदर मशिन सुरू आहे. या मशिनच्या सहाय्याने मद्यपी चालकांची तपासणी केली जाणार आहे. याचा धस्का मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांनी घेतला आहे.नववर्षाच्या प्रारंभीला अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ होते. हा दरवर्षीचा पोलिसांचा अनुभव आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने यावर्षी सुसज्य तयारी केली आहे. शहरातील चारही प्रमुख मार्गांवर नाकेबंदी केली जाणार आहे. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत असलेल्या मार्गांवर स्वतंत्र नाका उभारून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे. यामुळे मद्यपींचे धाबे दणाणले आहेत. (नगर प्रतिनिधी)