शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

१० गावांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:30 IST

सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातील सोमनपल्ली भागात जोरदार वादळ आल्याने सोमनपल्ली गावापासून तीन किमी अंतरावर विद्युत खांब तुटून पडले. तसेच अनेक ठिकाणी वीज ताराही तुटल्या. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागातील जवळपास १० गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

ठळक मुद्देवादळाचा तडाखा : सोमनपल्ली गावानजीक वीज खांब तारा तुटून पडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातील सोमनपल्ली भागात जोरदार वादळ आल्याने सोमनपल्ली गावापासून तीन किमी अंतरावर विद्युत खांब तुटून पडले. तसेच अनेक ठिकाणी वीज ताराही तुटल्या. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागातील जवळपास १० गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी या गावातील नागरिकांना रात्री अंधारात राहावे लागत आहे.आसरअल्ली - सोमनपल्ली दरम्यान पाच दिवसापूर्वी वादळी पाऊस बरसला. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले तसेच ताराही तुटून पडल्या. त्यामुळे पातागुडम, रायगुडम, पेंडलाया, सोमनपल्ली, कोपेला, पुल्लीगुडम आदींसह लगतची मिळून १० गावांतील वीज पुरवठा पूर्णत: बंद झाला आहे.विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज पुरवठ्याची दुरूस्ती करावी, वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी झिंगानूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. झिंगानूर परिसर हा चढ भाग असल्याने येथे दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. या भागात पाणीपातळी खालावली असल्याने हातपंपाला पाणी लागत नाही.सोलर बॅटरीच्या सहाय्याने मोबाईल केला जातो चार्जगडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम भागातील वीज पुरवठा गेल्या पाच-सहा दिवसांपासून बंद आहे. वादळाच्या तडाख्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. पातागुडम ग्रामपंचायतीमध्ये रायगुड्डम, पेंडलाया व पातागुडम आदी तीन गावांचा समावेश आहे. या तीन गावांमध्ये मागील वर्षी म्हणजे २०१८ मध्ये वीज पुरवठ्याची सोय करण्यात आली. मात्र जोरदार आलेल्या वादळाने वीज खांब कोसळले तसेच तारा तुटून पडल्या. त्यामुळे या तीन गावातील वीज पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सोलर बॅटरीच्या माध्यमातून आपला मोबाइल चार्ज करावा लागत आहे. मोबाइल चॉर्जिंगसाठी ग्रामपंचायतीमध्ये वीज नाही. झिंगानूरसारख्या दुर्गम भागात वीज बिघाडाची दुरूस्ती करण्यास नेहमी दिरंगाई होत असते.

टॅग्स :electricityवीज