शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

हिवतापाची साथ रोखण्यासाठी संवेदनशील ६५८ गावांत धूर फवारणीचा 'बूस्टर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 15:13 IST

आरोग्य यंत्रणा अलर्ट : दुसरी फेरी १८ सप्टेंबरपासून

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत हिवतापाची साथ रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले. वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना, औषधोपचार व प्रभावी जनजागृतीमुळे हिवताप विभागाला हिवतापावर नियंत्रण ठेवता आले. येणाऱ्या दिवसात हिवतापाची साथ येऊ नये, यासाठी डास प्रतिबंधक फवारणीची दुसरी फेरी १८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असून, संवेदनशील ६५८ गावांत फवारणीचा 'बूस्टर' देण्यात येणार आहे.

देसाईगंजवगळता इतर ११ तालुक्यांत जी गावे हिवतापाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. अशा गावांमध्ये जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या नियोजनात डास प्रतिबंधक फवारणीचे काम होणार आहे. पावसाळा आला की, विविध रोगांना आमंत्रण मिळते. घाणीचे साम्राज्य, घाण पाण्याचे डबके तसेच डासांची वाढती उत्पत्ती आदी कारणांमुळे जिल्ह्यात मलेरियाचाही प्रकोप वाढतो. पावसाळ्यात विविध प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. 

साचलेल्या पाण्यातून विविध आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो. या दिवसांत डेंग्यू चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. यापैकी मलेरिया ताप हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो डासांमुळे होतो. या आजारामध्ये तीव्र तापासोबत इतरही काही लक्षणे दिसून येतात.

जानेवारी ते आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण : ५३९२ ऑगस्टअखेर ते आतापर्यंत रुग्ण : १०७७ संवेदनशील प्राथमिक आरोग्य केंद्र : १६ संवेदनशील तालुका : भामरागड अधिक संवेदनशील केंद्र : लाहेरी व आरेवाडा 

आश्रमशाळांसह वसतिगृहातील डास उत्पत्ती रोखणार 

  • जिल्हा हिवताप कार्यालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने डास प्रतिबंधक फवारणीच्या दुसऱ्या फेरीमध्ये जिल्ह्यातील आश्रमशाळा, निवासी शाळा व वसतिगृहांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 
  • शासकीय, खासगी आश्रमशाळा, आदिवासी व समाजकल्याण विभागाचे २ वसतिगृह तसेच समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळांमध्ये फवारणी डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार आहे.

"सध्या भामरागड तालुका सोडला तर इतर तालुक्यात हिवतापाबाबत फारशी गंभीर परिस्थिती नाही. यंत्रणा नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. ज्या गावात तापाची साथ दिसते, अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी पोहोचून रक्तनमुने घेऊन निदान करीत आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांवर लागलीच औषधोपचार केला जात आहे. कोणालाही ताप आला किवा थोडेसे लक्षणे दिसली की, संबंधितांनी तत्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रक्ताची तपासणी करावी. पुजाऱ्याकडे न जाता रुग्णालयात जाऊन पूर्ण उपचार घ्यावे."- डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली