लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पार पडली नाही. त्यामुळे काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक तर काही शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे होती. बदली प्रक्रिया होण्याची आशा आता मावळली असल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी ५१ शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन शिक्षकांचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.६८ प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेवर आक्षेप घेत मागील वर्षी याचिका दाखल केली होती. त्यामुळे २०१९-२० या वर्षातील बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेला राबविता आली नाही. त्यामुळे काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक झाले. तर काही शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त होती. सर्वच शाळांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी प्रतिनियुक्ती करणे आवश्यक झाले होते. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी सबंधित शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली आहे.गडचिरोली पंचायत समितीमधील वसा, आंबेटोला, आंबेशिवणी, वाकडी, पारडी, खुर्सा, गोगाव, मुरखळा, देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील कन्या शाळा, पोटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन लाडज, कुरखेडा तालुक्यातील रामगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, भटेगाव, लेंढारी येथील शाळांमध्ये शिक्षकांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.धानोरा तालुक्यातील निमगाव, तुमडीकसा, झरी, मेंढाटोला, आंबेझरी, गोतेहूर, सावरगाव केंद्रातील कोसरी नंबर १, वडगाव केंद्रातील कोसमी नंबर १, मुरूमगाव, कटेझरी नंबर १, फुलबोडी, गोडलवाही, कोरची तालुक्यातील मोठाझेलिया, देऊळभट्टी, कोरची, गहाणेगाटा, हेटाळकसा, एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली, कुदरी, दुस्सागुड्डा, कर्रेम, मेंढरी, सिरोंचा तालुक्यातील राजीवनगर, नासीरखॉपल्ली, मुलचेरा तालुक्यातील उदयनगर, आरमोरी तालुक्यातील देलोडा बुज, चामोर्शी तालुक्यातील नाचगाव, मारोडा, चित्तरंजनपूर, राजगोपालपूर, विकासपल्ली, सुभाषग्राम या जिल्हा परिषद शाळांना प्रतिनियुक्तीने शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.समुपदेशनाने मिळाले दुर्गम गावांना शिक्षकयावर्षी शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविता आली नाही. न्यायालयाच्या निर्देशानंतर समुपदेशनाने न्यायालयीन प्रकरणातील ६० शिक्षक प्रतिनियुक्तीने रूजू झालेले ५७ शिक्षक व आंतरजिल्हा बदलीने बदलून जिल्ह्यात आलेले १८ शिक्षक यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. या सर्व शिक्षकांना एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्येच प्रतिनियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शाळांना पहिले सत्र संपताना का होई ना, शिक्षक मिळाले आहे. जिथे रिक्त आहेत तिथेही लवकर शिक्षक मिळावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रिक्त पदांना प्रतिनियुक्तीचा बुस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST
६८ प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेवर आक्षेप घेत मागील वर्षी याचिका दाखल केली होती. त्यामुळे २०१९-२० या वर्षातील बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेला राबविता आली नाही. त्यामुळे काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक झाले. तर काही शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त होती.
रिक्त पदांना प्रतिनियुक्तीचा बुस्टर
ठळक मुद्दे५१ शिक्षकांची प्रतिनियुक्ती : बदली प्रक्रिया रखडल्याने निर्माण झाला पेच