शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बोडीत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, शंका-कुशंकांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 12:44 IST

एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाजवळच्या बोडीत आढळून आला असून अनेक चर्चांना उधाण आले आहे. तिचे आई-वडील सोयाबीन कापणीसाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात गेले होते. घरात तिची आजी आणि लहान भावासह ती राहात होती.

ठळक मुद्देदोन दिवसांपासून होती बेपत्ता

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा टोली येथील एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाजवळच्या बोडीत (छोटा तलाव) आढळल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे त्या मुलीचे आई-वडील मजुरीसाठी वर्धा जिल्ह्यात गेले असताना ही घटना घडली. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशातून झाला, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, किरण सुनील चंदनखेडे (१५ वर्ष) असे त्या मृत मुलीचे नाव आहे. ती नवव्या वर्गात शिकत होती. तिचे आई-वडील सोयाबीन कापणीसाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात गेले होते. घरात तिची आजी आणि लहान भावासह ती राहात होती. दरम्यान, १५ ते १६ च्या दरम्यान ती घरी आलीच नाही. त्यामुळे १६ ला किरणच्या काकांनी तिच्या वडिलांना याबाबतची माहिती दिली.

दरम्यान तिचे आई-वडील गावी पोहोचल्यानंतर शोधाशोध करण्यात आली; पण तिचा थांगपत्ता लागला नाही. रविवारी (दि.१७) गडचिरोली पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार देण्यात आली. दरम्यान सोमवारी सकाळी गावातील गुराखी वसंत नन्नावरे तिकडे शौचास गेला असताना त्याला किरणचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

हा घातपात आहे की आत्महत्या? आत्महत्या असेल तर ती कोणत्या कारणातून? तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे कोण? घातपात असेल तर कोणी तिला मारले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

व्हिडिओ शुटींगमध्ये पंचनामा

पोलिसांनी व्हिडिओ शुटींग करत घटनास्थळी पंचनामा केला. नंतर मृतदेह बाहेर काढून गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या चमूने सायंकाळी शवविच्छेदन केले. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि तिच्या अंगावर मार लागल्याच्या काही जखमा आहेत का, हे कळू शकेल. पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू