शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गरीब- गरजूंना बाेदली ग्रामपंचायत देणार मदत; सरपंच सहायता निधीची केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:19 IST

अनाेखा प्रयाेग : रुग्णांना उपचार, शस्त्रक्रिया, हाेतकरू विद्यार्थ्यांना मिळेल दिलासा

गडचिराेली : गावातील गरीब व गरजूंना आराेग्य उपचार, हाेतकरूंना शिक्षणासाठी तसेच इतरांना संकटकाळात मदतीचा हात म्हणून आर्थिक सहाय्य करण्यासाठी गडचिराेली तालुक्याच्या बाेदली ग्रामपंचायतीने ‘सरपंच सहायता निधी’ची सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील हा अनाेखा उपक्रम असून राज्यातीलही अनाेखा प्रयाेग असू शकताे.

एखाद्या गंभीर आजारावर उपचार, हाेतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, गरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी मदत, अपघातात जखमी झालेल्यांना मदत, यासह विविध प्रकारच्या संकटकाळात गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर बाेदली येथे सरपंच आकाश निकाेडे यांच्या नेतृत्वात सरपंच सहायता निधीची सुरूवात सप्टेंबर २०२४ पासून करण्यात आलेली आहे. मागील तीन महिन्यात मंजुरीच्या सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आल्या.

अशी पूर्ण केली परवानगीची प्रक्रियाबाेदली ग्रामपंचायतने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकारातून ग्रामपंचायतला सरपंच सहायता निधी सुरू करण्याबाबत अर्ज दिला. त्यानंतर या अर्जावर मासिक सभेत चर्चा झाली. येथे चर्चा केल्यानंतर ग्रामसभेत सदर याेजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली.

काेणाला देणार मदत?सरपंच सहायता निधीतून सध्यातरी ग्रामपंचायत हद्दीतील गरजू व्यक्तींना ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत सहायता दिली जाणार आहे. यासाठी गरजू व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपयांच्या आतील असावे, अशी अट आहे. १ काेटी रुपयांपर्यंत निधी वाढविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्राबाहेरील गरजूंनासुद्धा आर्थिक मदत दिली जाईल.

अशी चालणार कार्यप्रणालीगरजूला थेट मदत दिली जाईल. या मदतीचा लेखाजाेखा १६ सदस्यीय सरपंच सहायता निधी समितीच्या व ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत मांडला जाईल. म्हणजेच सरपंच सहायता निधीत दानदात्यांकडून जमा झालेली रक्कम व गरजूंना वाटप केलेली रक्कम याचा लेखाजाेखा महिन्याला ठेवला जाईल.

"गरीब व गरजूंना आर्थिक मदत व्हावी, यासाठी आम्ही सरपंच सहायता निधीची सुरूवात केली आहे. या निधीत दानदात्यांनी दान केल्यास अधिकाधिक गरीब व गरजूंना संकटकाळात मदत मिळू शकेल."- आकाश निकाेडे, सरपंच, बाेदली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली